न्यूझीलंड संघाचा दिग्गज वेगावन गोलंदाज ट्रेंट बोल्ट (Trent Boult) याने त्यांच्या संघासाठी आतापर्यंत अनेकदा महत्वपूर्ण प्रदर्शन केले आहे. बोल्टने गोलंदाजीत न्यूझीलंड संघाला महत्वाचे योगदान दिले आहे, पण फलंदाजीत तो जास्त काही पराक्रम करू शकला नाही. त्याने कारकिर्दीत फक्त एक अर्धशतक केले आहे. परंतु, गुरुवारी (२३ डिसेंबर) सुपर स्मॅश (super smash) लीगमध्ये त्याने जे प्रदर्शन केले, ते एखाद्या चांगल्या फलंदाजाला देखील लाजवू शकते.
बोल्ट सुपर स्मॅश लीगमध्ये नॉर्थन डिस्ट्रिक्ट्स संघाचा भाग आहे. गुरुवारी(२३ डिसेंबर) सुपर स्मॅशमध्ये कँटरबरी आणि नॉर्थन डिस्ट्रिक्ट्स संघात आमना सामना झाला. या सामन्यात नॉर्थन डिस्टिक्ट्सने एक विकेटने विजय मिळवला. नॉर्थन डिस्ट्रिक्ट्सला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर सहा धावांची आवश्यकता होती. एखादा सेट झालेला उत्कृष्ट फलंदाज देखील अशा परिस्थितीला खेळताना घाबरेल, पण ट्रेंट बोल्टने मात्र शेवटच्या चेंडूवर न घाबरता षटकार मारून दाखवला आणि त्याच्या संघाला विजय मिळवून दिला.
नॉर्थन डिस्ट्रिक्ट्स संघासाठी हा विजय एवढा अवघड नव्हता, परंतु शेवटच्या षटकात त्यांचे तीन फलंदाज तंबूत परतले आणि शेवटच्या चेंडूवर सहा धावांची आवश्यकता निर्माण झाली. अशात बोल्डने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून कँडरबरी संघाची विजयाची आशा धूळीत मिळवली.
Northern Knights need 6 from the final ball and Trent Boult smashed a six in Super Smash T20.https://t.co/n2IXaP4lOi
— Johns. (@CricCrazyJohns) December 23, 2021
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना कँटरबरी संघ १७.२ षटकात १०७ धावा करून सर्वबाद झाला होता. अशात नॉर्थन डिस्ट्रिक्ट्ससाठी हा विजय सोपा होता, पण विरोधी संघाच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे हा कठीण होऊन बसला.
नॉर्धन डिस्ट्रिक्ट्सच्या फलंदाजीवेळी शेवटच्या षटकात कँटरबरीचा एड नटल गोलंदाजीसाठी आला होता. नटलने शेवटच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूवर दोन विकेट्स घेतल्या. यावेळी अनुराग वर्मा आणि ईश सोढी पहिल्या दोन चेंडूत त्याचे शिकार बनले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर जो वॉकर देखील शून्य धावांवर तंबूत परतला. पण बोल्टने मात्र शेवटच्या चेंडूवर चमत्कार केला.
अधिक वाचा – सेंच्युरियन कसोटीत रिषभ पूर्ण करणार सर्वात वेगवान शतक? धोनीला टाकणार मागे?
बोर्टने या सामन्यात अवघ्या दोन चेंडूंचा सामना केला आणि नाबाद ७ धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. फलंदाजी करण्यापूर्वी गोलंदाजीत देखील त्याने दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या –
प्रो कबड्डी २०२१: पटना पायरेट्सने जिंकला पहिला सामना, हरियाणा स्टिलर्स अटीतटीच्या लढतीत पराभूत
रवींद्र जडेजावरही चढला ‘पुष्पा’ चित्रपटाचा फिव्हर; शेअर केलेल्या व्हिडिओवर अल्लू अर्जुनची खास कमेंट
व्हिडिओ पाहा – युवी अन् भज्जीमुळं भर टीम मीटिंगमध्येच रडला दादा