---Advertisement---

संपूर्ण यादी – विश्वचषक इतिहासात आत्तापर्यंत या गोलंदाजांनी घेतली आहे हॅट्रिक

---Advertisement---

लंडन। शनिवारी(29 जून) 2019 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात लॉर्ड्स मैदानावर 37 वा सामना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने हॅट्रिक घेतली आहे.

त्याने या सामन्याच्या पहिल्या डावात न्यूझीलंडकडून शेवटच्या षटकात गोलंदाजी करताना सलग तीन चेंडूवर विकेट घेत हॅट्रिक साजरी केली. त्याने या षटकातील तिसऱ्या चेंडूवर उस्मान ख्वाजाला तर चौथ्या चेंडूवर मिशेल स्टार्कला यॉर्कर टाकत त्रिफळाचीत केले. त्यानंतर त्याने पाचव्या चेंडूवर जेसन बेऱ्हेंडॉर्फला पायचित केले आणि या विश्वचषकात हॅट्रिक साजरी केली.

त्यामुळे ट्रेंट बोल्ट हा विश्वचषकात हॅट्रिक घेणारा न्यूझीलंडचा पहिलाच गोलंदाज ठरला. तसेच विश्वचषक इतिहासात हॅट्रिक घेणारा एकूण 10 वा गोलंदाज ठरला आहे.

त्याचबरोबर बोल्ट 2019 च्या विश्वचषकात हॅट्रिक घेणारा दुसरा गोलंदाज आहे. याआधी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अफगाणिस्तान विरुद्ध हॅट्रिक घेतली होती.

विश्वचषक इतिहासात आत्तापर्यंत फक्त लसिथ मलिंगाला दोन वेळा हॅट्रिक घेण्यात यश आले आहे. त्याने 2007 आणि 2011 च्या विश्वचषकात हॅट्रिक घेण्याची कमाल केली आहे. अन्य 9 गोलंदाजांना प्रत्येकी एकदा विश्वचषकात हॅट्रिक घेता आली आहे.

या सामन्यात बोल्टने हॅट्रिक घेतली असली तरी मात्र न्यूझीलंडला 86 धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे. त्यांना ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना दिलेल्या 244 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 43.4 षटकात सर्वबाद 157 धावाच करता आल्या.

आत्तापर्यंत या गोलंदाजांनी घेतली आहे विश्वचषकात हॅट्रिक –

1987 – चेतन शर्मा (भारत)

1999 – सक्लेन मुश्ताक (पाकिस्तान)

2003 – चामिंडा वास (श्रीलंका)

2003 – ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया)

2007 – लसिथ मलिंगा (श्रीलंका)

2011 – केमार रोच (विंडीज)

2011 – लसिथ मलिंगा (श्रीलंका)

2015 – स्टिव्हन फिन (इंग्लंड)

2015 – जेपी ड्युमिनी (दक्षिण आफ्रिका)

2019 – मोहम्मद शमी (भारत)

2019 – ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

शमी पाठोपाठ ट्रेंट बोल्टनेही घेतली २०१९ विश्वचषकात हॅट्रिक, पहा व्हिडिओ

मार्टिन गप्टिलने घेतला स्टिव्ह स्मिथचा एका हाताने जबरदस्त झेल, पहा व्हिडिओ

क्रिकेट नाही तर आता या क्षेत्रातून मनोरंजन करणार युवराज सिंग

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment