न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने टी20 विश्वचषकातील शेवटचा टी20 सामना खेळल्यानंतर इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने अनेक फोटोही शेअर केले आहेत. या फोटेंद्वारे ट्रेंट बोल्टने सहकारी खेळाडू केन विल्यमसन आणि टीम साऊथी सोबत मैदानावर घालवलेले अविस्मरणीय क्षणांना उजाळाला दिला आहे.
सध्या चालू असलेल्या टी20 विश्वचषक 2024 मध्ये न्यूझीलंडच्या खराब कामगिरीनंतर ट्रेंट बोल्टने निवृत्ती जाहीर केली. पापुआ न्यू गिनीसोबत शेवटचा साखळी सामना खेळल्यानंतर ट्रेंट बोल्टने टी20आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. बोल्टने शेवटच्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 4 षटकात 14 धावा देऊन 2 बळी घेतले. निवृत्तीनंतर बोल्टने त्याच्या इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केला आहे.
View this post on Instagram
बोल्टने पोसिट मध्ये लिहले. “वेळ किती लवकर निघून जातो. कोण विचार केले हाते लहानपणी एकत्र खेळायचो तेव्हा कोणाला वाटलेले आपण एवढे पुढे येऊ. केन विल्यमसन आणि टीम साउथीसोबत अनेक संस्मरणीय क्षण शेअर करणे खूप छान वाटले.” यावर प्रतिक्रिया देताना टीम साउथीने लिहिले की, हा प्रवास खूपच रोमांचक होता भाऊ.
शेवटच्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने स्वत: आणि टीम साउथी यांच्यातील मैत्रीबद्दल सांगितले. बोल्ट म्हणाला, टीमसोबत अनेक अविस्मरणीय क्षण घालवण्याची संधी मिळाली. गोलंदाजीत भागीदारी करणे खूप छान होते. साउथी मैदानावर आणि मैदानाबाहेर चांगला मित्र आहे. मी त्यासोबत छान आठवणी आणि आशा घेऊन निघू इच्छितो.
महत्तवाच्या बातम्या-
स्मृती मानधनानं रचला इतिहास! 84 सामन्यांतच 7 शतके झळकावून केली मिताली राजची बरोबरी
स्मृती मानधना, हरमनप्रीत कौरची शानदार शतकी खेळी, दक्षिण आफ्रिकेसमोर 326 धावांचं आव्हान
आजपासून सुपर-8 चा थरार, पहिल्याच सामन्यात दक्षिण अफ्रिकेसमोर अमेरिकेचे तगडे अव्हान!