आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २ वर्षांपूर्वी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात केली होती. आता या स्पर्धेचा अंतिम सामना १८ ते २२ जून दरम्यान खेळला जाणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन संघांमध्ये होणारा हा अंतिम सामना साउथॅम्प्टन इथे खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांनी या स्पर्धेत आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
सध्या भारत व न्यूझीलंड हे दोन्ही संघ इंग्लंडमध्ये आहेत. न्यूझीलंड इंग्लंडविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे तर भारतीय संघ हा अंतिम सामन्यासाठी कसून सराव करत आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या दुसर्या सामन्यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट खेळण्याची शक्यता नव्हती. परंतु, त्याला क्वारंटाईनच्या नियमातून काही सुट मिळाल्याने तो दुसऱ्या सामन्यात मैदानात उतरला. याबद्दल बोलताना त्याने या सामन्याता कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
मे महिन्यात आयपीएल २०२१ पुढे ढकलल्यानंतर बोल्टला आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवायचा होता. म्हणूनच तो संघासह इंग्लंड दौर्यावर न येता काही दिवस उशीराने इंग्लंडला आला.
बोल्ट म्हणाला की “सुरुवातीला मला या सामन्यात खेळण्याची अपेक्षा नव्हती. नंतर गोष्टी चांगल्या झाल्या आणि मलाही संधी हवी होती. मला वाटते की मैदानात उतरणे नक्कीच चांगले होईल. नेटमध्ये सराव करणे म्हणजे सामना खेळण्यासारखे नाही. सामन्यात, आपल्याला दिवसातून तीन, चार किंवा पाच वेळा पुनरागमन करण्याची संधी असते. याशिवाय आणखी चांगला कोणताही मार्ग असू शकत नाही.”
तो म्हणाला, “मला आशा आहे की यामुळे मी चांगल्या स्थितीत असेल. पायाच्या बोटामध्ये थोडासा त्रास होतो परंतु जेव्हा आपण बूट घालून ३० षटके गोलंदाजी करता तेव्हा असे होते. मी साउथॅम्प्टनमध्ये पुढच्या आठवड्यातील सामन्यासाठी खूप उत्साही आहे. येत्या काही दिवसात मला मिळणाऱ्या संधीबद्दल मी तितकाच उत्साही आहे.”
बोल्टने आतापर्यंत न्यूझीलंडसाठी एकूण ७१ कसोटी सामने खेळले आहे आणि त्यात त्याने २.९८ च्या इकॉनॉमिने २८१ विकेट्स घेतल्या आहे. त्याने एका सामन्यात १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. इंग्लंडमध्ये ट्रेंट बोल्ट हा चांगले प्रदर्शन करू शकतो त्याची बॉल स्विंग करण्याची कला खूप उत्तम आहे. भारतासाठी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये तो खूप घटक ठरू शकतो.
महत्वाच्या बातम्या
भारतीय वंशाच्या ‘या’ क्रिकेटपटूंचा पाकिस्तान सुपर लीगमध्ये बोलबाला, रहस्यमयी गोलंदाजाचाही समावेश
जबरदस्त हिम्मत! ज्या कारणामुळे संघाबाहेर झाला, चुरशीच्या टी२० विश्वचषकात त्यातच आजमावणार हात