न्यूझीलंड संघाचा गोलंदाज ट्रेंट बोल्ट एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. आगामी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाचा तो एक महत्वाचा भाग आहे. या सामन्यापूर्वी बोलतांना बोल्टने न्यूझीलंडचा संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावू शकेल, असा विश्वास व्यक्त केला. विश्व कसोटी अजिंक्यपद आजचा अंतिम सामना 18 जून ते 22 जून पर्यंत साउथम्प्टन मध्ये खेळला जाणार आहे.
ट्रेंट बोल्टच्या मते विश्व कसोटी अजिंक्यपद सामन्यांची पात्रता फेरी हे एक रहस्य आहे. परंतु या न्यूझीलंडच्या खेळाडूला विश्वास आहे की, त्याचा संघ उत्कृष्ट कामगिरी करण्यात सक्षम आहे. कारण या अगोदर भारत आणि न्यूझीलंड संघ एकमेकांविरुद्ध सामना खेळलेले आहेत. यात न्यूझीलंडने मागील वर्षी भारताला पराभूत करण्यात यश मिळवले आहे. या दोन्ही संघात 18 जून पासून अंतिम युद्ध सुरू होणार आहे.
बोल्टने बे ओवल मध्ये मुलाखत देताना सांगितले की, “ज्या प्रकारे न्यूझीलंड संघ मायदेशात आणि संपूर्ण जगामध्ये प्रदर्शन करत आहेत. त्यावरून खेळाडूंची उमेद वाढत आहे आणि ते एक उत्कृष्ट कामगिरी करण्यात यश मिळवतील.” तो पुढे म्हणाला की, “विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना हा एक खूप मोठा सामना आहे. आणि त्यामध्ये संघासाठी चांगली कामगिरी करायला मिळेल याची मला आशा आहे. आणि आम्ही एक इतिहास घडवू याचा आम्हाला विश्वास आहे.”
बोल्ट पुढे म्हणाला की, “मला ही पात्रता प्रक्रिया समजायला थोडा वेळ लागेल. पण या अंतिम सामन्यात पोहोचल्यामुळे माझा खूप उत्साह वाढलेला आहे.” विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात वापरला जाणाऱ्या चेंडूबद्दल बोल्टला विचारल्यानंतर तो म्हणाला की, “मला देखील या चेंडू सोबत खेळण्याचा काही अनुभव नाही. इंग्लंडमध्ये काही सामने कसोटी सामने खेळले होते. परंतु हा चेंडू खूप स्विंग होतो. मला या गोष्टीची आशा आहे की, आमच्या संघातील सर्वच खेळाडू या गोष्टीला घेऊन खूप उत्साहात असतील. आणि तुम्हा सर्व चाहत्यांचे मनोरंजन देखील करतील.” विश्व कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामना अगोदर न्यूझीलंड इंग्लंड विरुद्ध दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यासाठी न्यूझीलंडचा खेळाडू बोल्ट ज्याने 71 कसोटी सामन्यात 281 बळी घेतल्या आहेत, तो सज्ज आहे. बोल्ट गुरुवारी इंग्लंडला रवाना होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
वडिलांच्या जन्मदिनी एबी बनला गायक, मॅक्सवेलने खेचली टांग
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील या गोष्टीवर रवी शास्त्री नाराज, आयसीसीला सुचवला बदल
मला बोर्डाचे चेअरमनपद दिले तर मी वेगवान गोलंदाजांची कमतरता जाणवू देणार नाही