वनडे विश्वचषक 2023 मधील सहावा सामना न्यूझीलंड आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला गेला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी धमाकेदार प्रदर्शन केले. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेण्याऱ्या नेदरलँड्सला विजयासाठी 323 धावांचे लक्ष्य मिळाले. या धावांचा पाठलाग करताना नेदरलँड्सच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती. मात्र, न्यूझीलंडच्या क्षेत्ररक्षकांनी जबरदस्त क्षेत्ररक्षण केले. याचवेळी ट्रेंट बोल्ट याने एक जबरदस्त झेल टिपला.
न्यूझीलंडने दिलेल्या 323 धावांचा पाठलाग करताना नेदरलँड्सला 47 धावांवर दोन धक्के बसले होत. त्यानंतर मैदानात उतरलेल्या अष्टपैलू बास डी लिडे याने तीन चौकार मारत चांगली सुरुवात केली. तो नेदरलँड्सची धावसंख्या पुढे नेईल असे वाटत असताना त्याला रचिन रवींद्र याने बाद केले. मात्र, या बळीचे श्रेय ट्रेंट बोल्ट याला गेले.
https://www.instagram.com/reel/CyLkbs7Pufw/?igshid=MzRlODBiNWFlZA==
डी लिडे याने रचिन याच्या चेंडूवर लॉंग ऑफच्या दिशेने षटकार मारण्याचा प्रयत्न केला. चेंडूचा बॅटशी चांगला संपर्क झाल्याने हा षटकार जाईल असे वाटत असताना, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असलेल्या बोल्ट याने चेंडू टिपला. मात्र, आपण सीमारेषा बाहेर जात आहोत असे लक्षात येताच, त्याने चेंडू आतमध्ये फेकला. त्यानंतर त्याने बाहेरून पुन्हा एकदा आतमध्ये उडी घेत हा झेल पूर्ण केला.
या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा आपली क्षमता दाखवून दिली. विल यंग, रचिन रविंद्र व कर्णधार टॉम लॅथम यांनी संघासाठी अर्धशतके झळकावली. तसेच डेरिल मिचेल व सॅंटनर यांनी उपयुक्त खेळ्या करत न्यूझीलंडला 322 पर्यंत मजल मारून दिली. नेदरलँड्स संघासाठी आर्यन दत्त याने दोन बळी मिळवले.
(Trent Boult Took Stunner Of Bas De Leede In ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या –
सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये विराटचा Gold Medal ने सन्मान, पण का दिले पदक? पाहा व्हिडिओ
टॅलेंटेड रचिनचा टॉप फॉर्म कायम! सलग दुसऱ्या सामन्यात चोपली विरोधी गोलंदाजी, केल्या इतक्या धावा