आयपीएल 2024 चा 31 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स झाला. या सामन्यात राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टनं एक असा यॉर्कर टाकला, की ज्यामुळे चक्क स्टंपच तुटला! त्याच्या या एका यॉर्करनं सुमारे 10 लाखांचं नुकसान झालं. स्टंप तुटल्यानं काही काळ सामना थांबला होता. आता या तुटलेल्या स्टंपची भरपाई बोल्टला करावी लागेल का?, या बातमीद्वारे जाणून घ्या.
कोलकाताच्या डावात 18व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ट्रेंट बोल्टनं सुनील नारायणला अचूक यॉर्कर टाकून बाद केलं. बोल्टच्या या चेंडूनं स्टंप तुटला, ज्यामुळे सामना काही काळ थांबला होता, कारण नवीन स्टंप आणून तो बसवायला वेळ लागला. आयपीएलच्या या हंगामात नवीन प्रकारचे स्टंप वापरले जात आहेत. स्टम्पमध्ये वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळे दिवे लावले जातात. उदाहरणार्थ, जेव्हा चौकार किंवा षटकार मारला जातो, तेव्हा स्टंपवर वेगळे दिवे चमकतात. तर जेव्हा वाइड किंवा नो बॉल असतो तेव्हा स्टंपवर वेगळ्या प्रकारचे दिवे चमकतात.
मीडिया रिपोर्ट्नुसार, या एका स्टंपची किंमत सुमारे 10 लाख रुपये आहे. म्हणजे, दोन्ही बाजूंच्या एकूण 6 स्टंपची किंमत 60 लाख रुपये एवढी आहे. हेच कारण आहे की आता खेळाडूंना पूर्वीप्रमाणे सामना जिंकल्यानंतर स्टंप घेऊन जाण्याची परवानगी नाही. पूर्वी लाकडी स्टंप वापरले जायचा. तेव्हा खेळाडू सामना जिंकल्यानंतर आठवण म्हणून स्टंप घेऊन जायचे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, स्टंप तुटल्यानंतर भरपाई देण्याचा कोणताही नियम नाही. जर एखाद्या गोलंदाजानं आपल्या गोलंदाजीत स्टंप तोडला तर त्याला कोणतीही भरपाई द्यावी लागत नाही. असं यापूर्वीही अनेकदा झालं आहे, जेव्हा गोलंदाजानं त्यांच्या वेगवान चेंडूनं स्टंप तोडला . परंतु त्यांना कोणत्याही प्रकारची भरपाई द्यावी लागत नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
मालक असावा तर असा! पराभवानंतर स्टेडियममध्ये भावूक झाला ‘किंग खान’, सामन्यादरम्यान दिसला वेगळाच अवतार