न्यू कबड्डी फेडरेशनने ‘इंडो इंटरनॅशनल प्रीमियर कबड्डी लीग’ या नावाने २६ जानेवारी २०१९ पासून लीग सुरू होत आहे. यास्पर्धेत सहभागी होण्यासाठी देशभरातून विविध राज्यात निवड चाचण्या घेतल्या जात आहेत.
तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगणा नंतर आता खेळाडू व पंचांसाठी १० डिसेंबर ते ११ डिसेंबरला महाराष्ट्र, विदर्भ, गोवा व गुजरात या राज्यासाठी निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे.
या राज्यातील सर्व एनकेएफआईमध्ये नोंदणी केलेल्या खेळाडू व पंचांनी शिवनेरी कबड्डी क्रीडा संकुल, शिवनेरी फिटनेस क्लब, वाडाचा मला रोड, चिखली, पिंपरी चिंचवड मध्ये सकाळी ९ वाजता हजर राहायचं आहे.
ज्यांनी अजून नोंदणी केली नसेल त्यांना एनकेएफआईच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपली नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी नंतर ते ट्रायलमध्ये सहभागी होऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या-
–१९ वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत औरंगाबाद विभागाच्या दोन्ही संघांनी पटाकवले विजेतेपद