सध्या भारताच्या कुस्तीमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध भारतीय कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केले आहे. भारतीय अव्वल कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांमुळे बृजभूषण यांच्यावर चौफेर टीका होते. काहीनी त्यांना बरखास्त करण्याची देखील मागणी केली आहे. एकीकडे सर्व कुस्तीपटू विरोधात असताना आता राष्ट्रकुल विजेता तसेच ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव याने बृजभूषण यांना पाठिंबा दिला आहे.
बुधवारी (दि. 18 जानेवारी) महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण आणि कुस्तीपटूंचा मानसिक छळ यांसारखे गंभीर आरोप लावत विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी संपूर्ण देशभरात एकच खळबळ माजवली. त्यानंतर या तिघांच्या नेतृत्वात अनेक युवा कुस्तीपटू आंदोलनाला बसले आहेत. तसेच, बृजभूषण शरण सिंग (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता नरसिंग यादव याने बृजभूषण यांना पाठिंबा दिला. नरसिंग म्हणाला,
“मला वाटते की शरण साहेबांनी विरोधात हा कट रचला आहे. उलट ते अध्यक्ष झाल्यापासून महासंघात अनेक बदल घडले. त्यांच्यामुळे इतर राज्यातील कुस्तीपटूंना देखील संधी मिळते. कुस्ती केवळ हरियाणा पूरती मर्यादित ठेवण्यात आली होती. मला ज्या प्रकारे अडकवले गेले तसाच हा काहीसा प्रकार आहे.”
नरसिंग यादव याने भारतासाठी 2014 राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तसेच तो तीन वेळा महाराष्ट्र केसरी देखील ठरला आहे. 2016 रिओ ऑलिंपिकसाठी नरसिंग थेट पात्र ठरला होता. मात्र, स्पर्धेच्या अगदी काहीच दिवस आधी तो डोपिंगमध्ये अडकला. त्यामुळे त्याच्या जागी अनुभवी सुशील कुमार याला ऑलिंपिकसाठी पाठवण्यात आले. तेव्हा नरसिंगने आरोप केला होता की, सुशील कुमार यादव याने कट रचून आपली कारकीर्द खराब केली.
(Triple Maharashtra Kesari Narsingh Yadav Back WFI President BrijBhushan Sharan Singh)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शॉकिंग! क्रिकेटच्या सर्वात मोठ्या बोर्डालाच लावला चुना; आयसीसीची तब्बल ‘इतक्या’ कोटीची फसवणूक
“जास्तीत जास्त टी10 लीग खेळवा”, भारताच्या जगज्जेत्या खेळाडूंनी केली मागणी