दक्षिण आफ्रिकेत नवीन वर्षात सुरू होणाऱ्या एसए टी20 लीगसाठी खेळाडूंचा लिलाव केपटाऊन येथे सुरू आहे. आयपीएलमधील सहा फ्रॅंचाईजींनी या स्पर्धेतील सहा ही संघ विकत घेतले आहेत. या लिलावात दक्षिण आफ्रिकेचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ट्रिस्टन स्टब्स याच्यासाठी सर्वच संघांनी बोली लावली. मात्र, अखेरीस सनरायझर्स ईस्टर्न केपने तब्बल 9.2 मिलियन रॅंडची तगडी बोली लावत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. तो आतापर्यंत लीगमधील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे.
दक्षिण आफ्रिका क्रिकेटला या नव्या लीगपासून भरपूर अपेक्षा आहेत. त्याचाच भाग म्हणून आयपीएलच्या धर्तीवर त्यांनी खेळाडूंचा लिलाव आयोजित केला आहे. लिलावाच्या पहिल्या फेरीत आठ मार्की खेळाडूंवर बोली लागली. यात अष्टपैलू मार्को जेन्सनला सनरायझर्स ईस्टर्न केपनेच 6.1 मिलियन रॅंडची बोली लावली. मार्की खेळाडूंत तो सर्वात जास्त किंमत घेणारा खेळाडू ठरला.
If you haven't found a reason to be eXXcited, we invite you to watch the teams battle it out to get the services of 22 year old Tristan Stubbs.#SA20Auction #SA20 pic.twitter.com/Q3yrRP3Qp4
— Betway SA20 (@SA20_League) September 19, 2022
मार्की खेळाडूंनंतर इतर खेळाडूंवर बोली लागली. यात केवळ 22 वर्षाच्या स्टब्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या स्टब्सला सनरायझर्सने 9.2 मिलियन रॅंडची रक्कम मोजली. स्टब्सला दक्षिण आफ्रिका क्रिकेटचे भविष्य मानले जाते. त्याने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेसाठी केवळ 6 टी20 सामने खेळले आहेत. यावर्षी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने त्याला हंगामात आपल्या संघात सामील करून घेतले होते. मात्र, आयपीएलमध्ये त्याला केवळ दोन सामने खेळता आले. इंग्लंडविरुद्ध 72 धावांची वादळी खेळी केल्यानंतर तो चर्चेत आला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पत्रकारावर का भडकला रोहित? प्रेस कॉन्फरन्समध्ये नक्की काय घडलं?
जडेजाची रिप्लेसमेंट मिळाली! संघाला आपल्या ऑलराऊंडर परफॉर्मन्सने जिंकून देणार सामना, कर्णधाराचे बडेबोल
का खास आहे टीम इंडियाची नवी ‘हर फॅन की जर्सी’? वाचा सविस्तर