भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतो. नुकताच तो त्याच्या कुटुंबियांसमवेत आणि मित्रपरिवाराबरोबर सुट्टीची मजा घेण्यासाठी शिमला येथे गेला होता. त्याच्या शिमल्यातील वास्तव्यादरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान, त्याच्या एका फोटोमुळे तो ट्रोल झाला होता, पण आता त्या फोटोमागील खरे कारण समोर आले आहे.
धोनी हिमाचल प्रदेशमध्ये सुट्ट्यांसाठी एका डोंगरावरील एका सुंदर कॉटेजमध्ये थांबला होता. तेथील त्याचा एक फोटो तो कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाने पोस्ट केला होता. त्या फोटोत दिसत होते की लाकडी तुकड्यांवर ‘झाडे लावा, जंगल वाचवा’, असा संदेश लिहिलेला आहे आणि धोनी त्या संदेशाच्या शेजारी उभा आहे. तसेच धोनीने त्या संदेशाच्या जवळ त्याची स्वाक्षरीही केली आहे.
या फोटोनंतर धोनी मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला. ट्रोल करणाऱ्यांचे म्हणणे होते की धोनीने हा संदेश झाडाच्या कापलेल्या लाकडावर लिहून दिला आहे. त्यामुळे हा मोठा विरोधाभास आहे.
Planting the right thoughts! 💛
Thala 😍#WhistlePodu #Yellove 🦁 pic.twitter.com/rbZmSwGA2n— Chennai Super Kings (@ChennaiIPL) June 25, 2021
फोटोमागील हे आहे सत्य
पण, या फोटोमागील सत्य जेव्हा समोर आले, तेव्हा अनेक चाहत्यांनी धोनीचे कौतुकही केले आहे. मीनाबाद होम्सने धोनीचे त्या लाकडी तुकड्यांवरील संदेशाच्या जवळ स्वाक्षरी करतानाचे फोटो शेअर करत, त्यामागील खरे कारण सांगितले आहे. त्यांनी सांगितले आहे की लाकडाच्या कारखान्यातून कचरा म्हणून फेकलेल्या तुकड्याचा हा संदेश देण्यासाठी उपयोग केलेला आहे. असे लाकडी तुकडे हिमाचल प्रदेशमध्ये शेकोटीसाठी वापरले जातात.
https://www.instagram.com/p/CQhytP_pqoX/
धोनीचा नवा लूक
धोनीचे शिमल्यामधील जे फोटो व्हायरल झाले, त्यात धोनी वेगळ्याच लूकमध्ये चाहत्यांना पाहायला मिळाला. धोनी अनेकदा त्याच्या लूकमुळे यापूर्वीही चर्चेत आला आहे. यावेळी पुन्हा एकदा तो त्याच्या लूकमुळे चर्चेत आला होता. धोनीने मिशा वाढवल्या असून त्याचा हा मिशांमधील लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
आयपीएल २०२१ च्या उर्वरित हंगामामध्ये दिसणार खेळताना
आयपीएल २०२१ चा हंगाम सुरू झाल्यानंतर धोनी पुन्हा एकदा खेळताना दिसणार आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल २०२१चा हंगाम २९ सामन्यांनंतर स्थगित करण्यात आला होता. या हंगामातील उर्वरित ३१ सामने युएईत खेळण्यात येणार आहेत. हा हंगाम स्थगित करण्यात आला, तेव्हा धोनीच्या नेतृत्त्वातील चेन्नई सुपर किंग्ज संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी होता.
महत्त्वाच्या बातम्या –
उर्वरित आयपीएल २०२१ पूर्वी राजस्थान रॉयल्स संघाला मिळाला नवा मालक
मिताली राजची ऐतिहासिक कामगिरी! सचिननंतर ‘अशी’ कामगिरी करणारी पहिली क्रिकेटपटू
रैनाचा नाही बॉलीवूड अभिनेत्यांवर विश्वास? बायोपिकसाठी सूचविली ‘ही’ दक्षिण भारतीय नावं