तुषार देशपांडे इंडियन प्रीमियर लीग 2023मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी सर्वाधिक विकेट्स घेऊ शकला आहे. मात्र, सोमवारी (29 मे) अंतिम सामन्यात तुषार देशपांडे सीएसकेसाठी सर्वात महागात पडला. तुषारने चार षटकांमध्ये 56 धावा कर्च केल्या आणि एकही विकेट घेऊ शकला नाही. आयपीएलच्या अंतिम सामन्यात आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा खर्च करणाऱ्यांमध्ये तुषार देशपांडे तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
आयपीएलच्या अंतिम सामन्यात संघासाठी सर्वात महागात पडला होता शेन वॉटसन. आयपीएल 2016मध्ये शेन वॉटसन (Shane Watson ) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी खेळत होता. या हंगामात आरसीबी अंतिम सामन्यात पोहोचली होती आणि शेन वॉटसनने तब्बल 61 धावा खर्च केल्या होत्या. परिणामी सनरायझर्स हैदराबादने हा सामना जिंकला होता. यादीत दुसऱ्या क्रमांकावर लॉकी फर्ग्युसन (Lockie Ferguson) आहे, ज्याने आयपीएल 2021च्या अंतिम सामन्यात केकेआरकडून सर्वाधिक 56 धावा खर्च केल्या होत्या. सीएसकेने या हंगामात अंतिम सामना जिंकून आपली चौथी आयपीएल ट्रॉफी जिंकली होती.
तुषाक देशपांडे (Tushar Deshpande) आता या यादीत तिसऱ्या क्रमांकावर नव्याने जोडला गेला आहे. सोमवारी (29 मे) अंतिम सामन्यात तुषारने गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात 56 धावा खर्च केल्या आहेत. तुषारची ही गोलंदाजी सीसकेसाठी चांगलीच महागात पडू शकते. यादीत चौथा क्रमांक करणवीर सिंग (Karanveer Singh) याचा आहे. पंजाब किंग्जसाठी करणवीरने आयपीएल 2014च्या अंतिम सामन्यात चार विकेट्स घेतल्या होत्या, मात्र यादरम्यान तब्बल 54 धावाही खर्च केल्या होत्या.
आयपीएलच्या अंतिम सामन्यात आपल्या सर्वात संघासाठी महागात पडलेले गोलंदाज
0/61 – शेन वॉटसन (आरसीबी) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – बेंगलोर, 2016
0/56 – लॉकी फर्ग्यूसन (केकेआर) विरुद्ध सीएसके – दुबई, 2021
0/56 – तुषार देशपांडे (सीएसके) विरुद्ध गुजरात टायटन्स – अहमदाबाद, 2023
4/54 – करणवीर सिंग (पंजाब किंग्ज) विरुद्ध केकेआर – बेंगलोर, 2014
दरम्यान, तुषारने आयपीएल 2023च्या अंतिम सामन्यात ज्या पद्धतीने धावा खर्च केल्या, त्याचा गुजरात टायटन्सला चांगलाच फायदा झाला. सीएसकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांमध्ये 4 बाद 214 धावा केल्या आहेत. तुषारने तब्बल 14च्या इकॉनॉमी रेटने धावा खर्च केल्या. (Tushar Deshpande has recently joined the list of highest run spenders in IPL finals)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘अरे तू कॅच नाही, IPL ट्रॉफी ड्रॉप केली’, गिलचा झेल सोडल्यानंतर चाहर जोरदार ट्रोल
‘शोमॅन’ गिलने केले ऋतुच्या विक्रमावर ‘राज’! 16 वर्षांच्या आयपीएल इतिहासात ठरला नंबर वन