---Advertisement---

‘२०२१ वर्ष आपलंच असेल!’, चेन्नईचे आव्हान संपल्याने ट्विटरवर आल्या भावनिक प्रतिक्रिया

---Advertisement---

रविवारी(२६ ऑक्टोबर) आयपीएल २०२० मध्ये ४५ वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. हा सामना राजस्थानने ८ विकेट्सने जिंकला. या सामन्यामुळे दोन्ही संघांपेक्षा चेन्नई सुपर किंग्स संघाला जास्त नुकसान झाले. हा सामना राजस्थानने जिंकल्याने अधिकृतपणे गणिती समीकरणांनुसार चेन्नई सुपर किंग्स संघ यंदाच्या आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

त्यामुळे या आयपीएल हंगामातील आव्हान संपणारा चेन्नई पहिला संघ ठरला आहे. तर अन्य ७ संघ अजूनही शर्यतीत टिकून आहेत.

विशेष म्हणजे आयपीएलच्या १३ वर्षांच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले की चेन्नई सुपर किंग्स संघ खेळत असताना ते प्लेऑफमध्ये प्रवेश करणार नाहीत. या हंगामाच्या आधी चेन्नईने खेळलेल्या सर्व १० आयपीएल हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे ८ वेळा त्यांनी अंतिम सामनाही खेळला आहे. त्यातील ३ वेळा विजय मिळत त्यांनी आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे.

मात्र यंदाचा हंगाम चेन्नईसाठी वाईट ठरला. त्यांनी आत्तापर्यंत खेळलेल्या १२ सामन्यांपैकी ८ सामने गमावले आहेत, तर केवळ ४ सामन्यात विजय मिळवला आहे. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असे झाले आहे की चेन्नईने साखळी फेरीतील ८ सामने गमावले आहेत.

त्यामुळे सध्या चेन्नईचे आव्हान आयपीएलमधून संपल्याने ट्विटरवर चाहत्यांकडून भावनिक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. काही चाहत्यांनी म्हटले आहे की पुढील वर्ष चेन्नईचं असेल, तर काहींनी पुढीलवर्षी दमदार पुनरागमन करा असेही म्हटले आहे.

https://twitter.com/Kishan16996/status/1320609164922482688

https://twitter.com/VeronicaaRawat/status/1320602461426479104

चेन्नईचे आता या आपीएल हंगामातील २ सामने उरले आहेत. यातील एक सामना गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होणार आहे, तर नंतर रविवारी किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

सुर्यकुमार यादवला मिळणार भारतीय संघात संधी? ‘या’ दिवशी होणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड

पुजारा, विहारी आणि शास्त्री लवकरच होणार युएईला रवाना, ‘हे’ आहे कारण

आयपीएल २०२०: मुंबईविरुद्ध राजस्थानच्या विजायनंतर चेन्नईचे आव्हान संपुष्टात; पाहा अशी आहे गुणतालिका

ट्रेंडिंग लेख –

ट्रेंडिंग लेख-

कमी धावा झाल्या म्हणून काय झालं! त्यातूनही मार्ग काढून थरारक विजय मिळवणारे ५ संघ

आयपीएल२०२०: टी२० मधील स्टार असूनही ‘या’ ३ खेळाडूंना अद्यापही मिळाली नाही खेळण्याची संधी

IPL 2020: ‘या’ ३ संघांचा प्लेऑफमध्ये प्रवेश जवळपास निश्चित, तर एका स्थानासाठी झगडणार ४ संघ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---