जगातील सर्वात मोठी टी२० लीग असलेल्या आयपीएलमध्ये खेळण्यासाठी खेळाडू संधीच शोधत असतात. युवा खेळाडूंसाठी ही लीग खूपच महत्त्वाची असते. कारण, या स्पर्धेत जर त्यांनी चमकदार कामगिरी केली, तर त्यांना राष्ट्रीय संघात संधी मिळण्याची शक्यता जरा जास्तच असते. मात्र, जर एखादा खेळाडू २ हंगाम संघात असेल आणि त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधीच मिळत नसेल, तेव्हा मात्र त्याच्या स्वप्नांना तडा बसण्याची शक्यताही जास्त असते. असेच काहीसे सध्या मुंबई इंडियन्स संघाचा युवा गोलंदाज अर्जुन तेंडुलकर याच्याबाबत घडताना दिसत आहे.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने शनिवारी (दि. २१ मे) मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाविरुद्ध हंगामातील आपला शेवटचा सामना खेळला. या सामन्यात मुंबई संघ अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याला खेळण्याची संधी देईल अशी चर्चा होती. मात्र, तसे काहीच झाले नाही. अर्जुनला पदार्पणाची संधी मिळालीच नाही. नाणेफेकीपूर्वी अर्जुनच्या हावभावांवरून असे वाटत होते की, त्याला संधी मिळेल. मात्र, रोहितने नाणेफेक जिंकून प्लेईंग इलेव्हनबाबत जेव्हा खुलासा केला, तेव्हा त्यात अर्जुन तेंडुलकरच्या नावाचा समावेश नव्हता. रोहितने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा २ बदल सांगितले.
अर्जुनला या हंगामातही पदार्पणाची संधी मिळाली नाही. त्याला आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात मुंबईने ३० लाखात खरेदी केले होते. मात्र, त्याला एकाही सामन्यात खेळवले नाही. मुंबईने जवळपास आपल्या सर्व खेळाडूंना संधी दिली, पण अर्जुनला पदार्पणापासून वंचित ठेवले. अशात पुन्हा एकदा अर्जुनला पदार्पणाची संधी न दिल्यामुळे नेटकरी मुंबईला ट्रोल करत आहेत. ट्विटरवरही अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
येथे पाहा ट्वीट्स-
एका युजरने ट्वीट करत म्हटले की, “मुंबई अर्जुन तेंडुलकरचे करिअर बर्बाद करत आहे.”
https://twitter.com/its_bot_/status/1528007237616402432
दुसऱ्या एका युजरने रोहित शर्मा, मुंबई आणि प्रशिक्षक माहेला जयवर्धनेला टॅग करत म्हटले की, “अजुन अर्जुन तेंडुलकर नाही, दोन वर्षात एकही संधी मिळाली नाही, हा त्याच्यासाठी खूप कठीण निर्णय नाही का?”
No #ArjunTendulkar today as well… Not a single chance in 2 years, Isn't it too hard decision for a youngster @mipaltan @ImRo45 @MahelaJay . That's really really bad decision and planning..
— 🇮🇳Kartik Shah (@kartikk1shah) May 21, 2022
आणखी एका युजरने रोहितवर निशाणा साधत ट्वीटमध्ये म्हटले की, “मला वाटते की रोहित शर्मा सचिन तेंडुलकरच्या वारशावर जळतो.”
I think @ImRo45 jealous about @sachin_rt Legacy.#ArjunTendulkar
— जय महाराष्ट्र (@iAutodidactic) May 21, 2022
एक मौका और एक मौके का इंतजार क्या होता है वो इनसे पूछें, इस सत्र में भी नहीं मिला मौका #ArjunTendulkar pic.twitter.com/q6sWWYRs0U
— Yogesh Sharma (योगेश शर्मा) (@JournalistYogi) May 21, 2022
Vada pav didn't take #ArjunTendulkar in and said looking for future? Wtf
— Qazi Tabrez Hasan (@tabrezhasan1122) May 21, 2022
It may be a Prank from MI regarding Arjun Tendulkar
— 🎰 (@StanMSD) May 21, 2022
https://twitter.com/WokeLiberal6/status/1528017835712073728
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवला, तर दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफसाठी क्वालिफाय करू शकणार नाही. दुसरीकडे, मुंबईच्या विजयाचा फायदा बेंगलोर संघाला होईल आणि ते प्लेऑफसाठी पात्र ठरतील.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई-दिल्ली सामन्यावर पावसाचं सावट, सामना रद्द झाल्यास आरसीबीचं काय होणार? बघा प्लेऑफचं गणित
आयपीएलचं टेन्शन विसरून श्रेयस अय्यर करतोय नुसता एंजॉय, बहिणीसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल
मोठी बातमी! मुंबई इंडियन्सविरुद्धच्या ‘करो वा मरो’ सामन्यात दिल्लीच्या धडाकेबाज पठ्ठ्याचे कमबॅक