नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम मध्ये पार पडलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. तसेच या विजयामुळे मालिकेत इंग्लंड संघाने २-१ ने आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने दिलेले १५७ धावांचे आव्हान इंग्लंड संघाने ८ गडी राखून १८.२ षटकातच पूर्ण केले. या सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी, कर्णधार विराट कोहलीने नाबाद ७७ धावांची खेळी करून सर्वांची मने जिंकली. भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक याने कोहलीचे कौतुक करताना एक मजेदार ट्विट केले आहे.
विराटची दमदार खेळी
तिसऱ्या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून यजमान भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र, अवघ्या २४ धावांत भारताचे तीन फलंदाज तंबूत परतले. अशा परिस्थितीत कर्णधार विराट कोहलीने छोट्या-छोट्या भागीदाऱ्या करत भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. विराटने ४६ चेंडूंमध्ये ८ चौकार व ४ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ७७ धावा केल्या. त्याने दुसऱ्या सामन्यातही नाबाद ७३ धावांची खेळी केली होती.
दिनेश कार्तिकने केले मजेदार
विराटच्या या आक्रमक अर्धशतकाचे कौतुक करताना भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक याने एक मजेशीर ट्विट केले. त्याने अप्रत्यक्षरीत्या दोन कारची तुलना करताना लिहिले, ‘सुरुवात कोरोला तर, शेवट फेरारीसारखा केला. किंग कोहली’. कार्तिकचे हे ट्विट चाहत्यांकडून चांगले पसंत केले जात आहे.
Starts like a corolla , finishes like a FERRARI #KingKohli
— DK (@DineshKarthik) March 16, 2021
चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
दिनेश कार्तिकच्या या मजेदार ट्विटनंतर चाहत्यांनी देखील त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले, ‘तुम्ही खूप सार्या कोरोला गाडीच्या मालकांना दुखावले आहे.’
oh boy you hurt many Corolla owners ????????????
— word_matters (@jagansanthanam) March 16, 2021
Ohh buoy, just hurt the Corolla owners badly ????
— Sandesh Damkondwar (@sandydamy) March 17, 2021
अन्य एका चाहत्याने जोस बटलरचे कौतुक करताना लिहिले, ‘जोस बटलर पहिल्या चेंडूपासून फेरारीसारखा खेळत आहे.’
Buttler on other end starts like Ferrari and ends like buggati veyron
— Nitesh Bhadoria (@BhadoriaNitesh) March 16, 2021
https://twitter.com/Faisalkw81/status/1371858373981900800
Matlab bina baat ke corolla ki le li. You won't get any sponsorship from toyota now and ferrari is anyways out of question.
— Jainsaab (@arihant81) March 17, 2021
DK sir, this is a very American Joke. In India, a corolla is a super expensive and a privileged commodity and Ferrari, an unthinkable :p
— Varun Nair (@Nair43Nair) March 16, 2021
सध्या भारतीय संघाबाहेर असलेला दिनेश कार्तिक देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडूची नेतृत्व करत आहे. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामात तो कोलकत्ता नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व करताना दिसून येईल.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबईने ‘या’ संघावर मिळवला चार चेंडूत विजय, होळकर स्टेडियमवर घडली ऐतिहासिक घटना
एकमेवाद्वितीय विराट! टी२० क्रमवारीत पाचव्या स्थानी येताच ‘हा’ कारनमा करणारा ठरला एकमेव फलंदाज






