भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज रोहित शर्मा (rohit sharma) याने न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेत भारतीय संघाच्या टी-२० कर्णधाराची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर बीसीसीआयने रोहितवर अजून एक मोठी जबाबदारी टाकली आहे. टी-२० पाठोपाठ रोहित आता भारताच्या एकदिवसीय संघाचेही नेतृत्व करणार आहे (new odi captain of team india). भारतीय संघाच्या आगामी दक्षिण अफ्रिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तर विराट कोहली आता फक्त कसोटी संघाचे नेतृत्व करेल. दरम्यान रोहितला एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी दिल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून ट्वीट करत भारताच्या नवीन एकदिवसीय कर्णधाराची माहिती दिली आहे. बीसीसीआयने त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले की, ‘भारताच्या वरिष्ठ निवडकर्त्यांनी एकदिवसीय आणि टी-२० संघाच्या कर्णधाराच्या रूपात रोहित शर्माची नियुक्ती केली आहे.’ बीसीसआयच्या या ट्वीटनंतर रोहितच्या चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे.
The All-India Senior Selection Committee also decided to name Mr Rohit Sharma as the Captain of the ODI & T20I teams going forward.#TeamIndia | @ImRo45 pic.twitter.com/hcg92sPtCa
— BCCI (@BCCI) December 8, 2021
दरम्यान रोहितला भारतासाठी पहिल्यांदा २०१७ च्या डिसेंबर महिन्यात टी-२० आणि एकदिवसीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर आता त्याला २०२१ च्या डिसेंबर महिन्यात भारताच्या टी-२० आणि एकदिवसीय संघाचा नियमित कर्णधार बनवले गेले आहे. रोहितला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्तीनंतर चाहते ट्वीटरवर त्याला शुभेच्छा देत आहेत.
एका चाहत्याने लिहिले की, ‘रोहित शर्मा आगामी टी-२० विश्वचषक २०२२ आणि एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल.’
Rohit Sharma will lead Team India in T20 World Cup 2022 and 2023 ODI World Cup. #RohitSharma @ImRo45 pic.twitter.com/5YcshTFUoM
— Mumbai Indians FC (@MIPaltanFamily) December 8, 2021
तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, ‘पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी नवीन युग, नवीन कर्णधार रोहित शर्मा.’
Dec, 2017 : Rohit Sharma captained India for the first time in ODIs.
Dec, 2017 : Rohit Sharma captained India for the first time in T20Is.
Dec, 2021 : Rohit Sharma appointed full-time team India captain in ODIs and T20Is.#Rohitsharma #IndianCricketTeam
— Umang Pabari (@UPStatsman) December 8, 2021
Ab ayega Maza !
Mumbai Cricket cha Raja 💙❤️🤗🤔🏆
Hopefully Virat can play without pressure in limited overs 🤗🤔💙❤️🏏👑 pic.twitter.com/oBwm5bespp
— Tanmoy Chakraborty🩺⚕️ (@Tanmoycv01) December 8, 2021
Beginning of Hitman's era 😎🔥💙 pic.twitter.com/8IH8nkSNoq
— Un-Lucky (@Luckyytweets) December 8, 2021
https://twitter.com/PankajPandit_/status/1468579204375605249?s=20
HITMAN @ImRo45 appointed as the new ODI captain of Indian team #RohitSharma pic.twitter.com/lUiKKIQ5xa
— Hajifar (@IamHajifaR) December 8, 2021
दरम्यान, माजी एकदिवसीय आणि टी-२० कर्णधार विराट कोहलीने टी-२० विश्वचषकानंतर तो टी-२० संघाचे नेतृत्व सोडणार असल्याचे आधीच सांगितले होते. विराटने बोलल्याप्रमाणे टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले आणि न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत ती जबाबदारी रोहित शर्मावर सोपवण्यात आली. रोहितने न्यूझीलंड टी-२० मालिकेत भारताला ३-० असा विजय मिळवून दिला.
आता या माहिन्यात भारताला तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळण्यासाठी दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जायचे आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघ रोहितच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय मालिका जिंकेल अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
हार्दिकने दिले अकाली निवृत्तीचे संकेत; ‘या’ कारणाने घेऊ शकतो निर्णय
‘या’ कारणांनी विराटला सोडावे लागले वनडे संघाचे नेतृत्व; ‘ते’ स्वप्न राहणार अपूर्ण