इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ऍजबस्टन येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस (०२ जुलै) जसप्रीत बुमराह याचा राहिला. भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार बुमराहने या दिवशी आपल्या विस्फोटक खेळीसह सर्वांचे लक्ष वेधले. त्यानंतर त्याने गोलंदाजी करतानाही इंग्लंडच्या संघाला अडचणीत टाकले. तसेच कर्णधार म्हणून मैदानावर असताना त्याने घेतलेल्या निर्णयांमुळे २७ षटकात इंग्लंडचा संघ ५ बाद ८४ धावा अशा स्थितीत राहिला. बुमराहच्या या प्रदर्शनाचे सोशल मीडियावर भरपूर कौतुक होत आहे.
जसप्रीत बुमराहचे उल्लेखनीय प्रदर्शन
रिषभ पंत आणि रविंद्र जडेजा यांच्या शतकी खेळींनंतर बुमराहने (Jasprit Bumrah) दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत १६ चेंडूत २ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ३१ धावांची आक्रमक खेळी खेळली. या खेळीदरम्यान त्याने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याचा चांगलाच समाचार घेतला. त्याने ब्रॉडच्या एका षटकात ४ चौकार, २ षटकार मारत २९ धावा जोडल्या. तसेच ब्रॉडने (Stuart Broad) टाकलेल्या ५ वाईड बॉल आणि एका नो बॉलच्या ६ अतिरिक्त धावांमुळे एका षटकात ३५ धावा खर्च झाल्या.
फलंदाजीतील या पैसावसूल प्रदर्शनानंतर त्याने गोलंदाजीतही आपला दम दाखवला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्याने ११ षटके गोलंदाजी करताना ३५ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. भारतीय संघाच्या कर्णधाराचे असे अष्टपैलू प्रदर्शन पाहून क्रिकेटप्रेमी खुश झाले आहेत.
बुमराहला नियमित कर्णधार बनवण्याची होतेय मागणी
अनेकांनी ट्वीटरवर त्याच्या प्रदर्शनाचे कौतुक (Twitter Reactions On Jasprit Bumrah Performance) केले आहे. काही चाहत्यांनी तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) बुमराहला कसोटी संघाचा नियमित कर्णधार बनवण्याची मागणीही केली आहे. “मी बुमराह भारतीय संघाचा नियमित कर्णधार बनण्याची वाट पाहात आहे. त्याच्यामध्ये कौशल्य आहे. मला माहिती नाही की, बीसीसीआयला त्याच्यातील हे कौशल्य समजायला किती वेळ लागेल.”
I personally have been waiting Bumrah to become captain for a long time. He has got the skills. I don’t know what took BCCI so long.
— ada (@shriadhar_ada) July 2, 2022
Jasprit Bumrah is my favourite bowler to watch although not quite so much against England.
— Michael Hall (@mihall44) July 2, 2022
Kisi se daro na daro lekin,
Chatkon se jarur darna chahiye.#bumrah— DevRaj Singh (@imdrsgaur) July 2, 2022
Most wickets by Indian captain at Edgbaston :
Jasprit Bumrah – 3*
Kapil Dev – 2— A.V. Raja Sekhar (@raju_tweets9) July 2, 2022
Captain leading from the front #Bumrah
— Ayush (@The_Longlived) July 2, 2022
दुसऱ्या चाहत्याने बीसीसीआयला विनंती करत लिहिले आहे की, “प्रिय बीसीसीआय, कृपया बुमराहला भारताच्या कसोटी संघाचा नियमित कर्णधार बनवा.”
Dear BCCI, please make Jasprit Bumrah permanent captain of our Indian test team.
— अनूप त्रिपाठी पथिक (@anoop29220) July 2, 2022
https://twitter.com/SohamKudalkar/status/1543268538869514240?s=20&t=s0c_9GBY2K3yDt7IFt8HRw
https://twitter.com/ItsRoshan1234/status/1543268761117294593?s=20&t=AeU6qvrhkCRtIWmavfYpUg
https://twitter.com/Ajiamsingh/status/1543263420996210689?s=20&t=1i7wc-SvHPU3FOK0DbOB1g
तसेच काहींनी बुमराहला मुंबई इंडियन्सचा भावी कर्णधार म्हणूनही संबोधले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी इतिहासातील पहिली धाव अन् पहिले शतक चोपले, तरीही फक्त ३ सामन्यांवर संपली कारकिर्द
‘आम्ही मरू शकत होतो…’, वेस्ट इंडीज दौऱ्यात बांगलादेशच्या संघासोबत नक्की काय घडले?
बुमराहचे धमाकेदार प्रदर्शन पाहून ब्रॉडला नव्हता बसत विश्वास, पाहा कशी होती रिएक्शन