---Advertisement---

द. आफ्रिकेनी मॅच जिंकली, पण चाहरने हृदय जिंकली; कौतुकाने चाहते म्हणाले, ‘हा धोनीच्या शाळेतील विद्यार्थी’

Deepak-Chahar-Batting
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका संघाने भारतीय (sa vs Ind 3rd odi) संघावर ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामन्यात ४ धावांनी विजय मिळवला. यासह भारतीय संघाने वनडे मालिका ३-० ने गमावली आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचा विजय झाला असला तरीदेखील भारतीय संघातील गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) चर्चेचा विषय ठरतोय. काय आहे नेमकं कारण? चला जाणून घेऊया.

भारतीय संघातील वेगवान गोलंदाज दीपक चाहर याने मिळालेल्या संधीचा पुरेपूर वापर केला. त्याने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्याने गोलंदाजी करताना २ गडी बाद केले. तर फलंदाजी करताना त्याने ३४ चेंडूत ५४ धावांची तुफानी खेळी केली. अवघ्या ३१ चेंडूंमध्ये त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले होते. या अप्रतिम खेळीनंतर चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.(Twitter reacts after all rounde performance of Deepak chahar)

व्हिडिओ पाहा- आज फारसे कुणाच्या लक्षात नसलेले टीम इंडियाचे एकेकाळचे पाच T20 Opener

दीपक चाहरची खेळी पाहून एका युजरने ट्विट करत लिहिले की, “दीपक चाहर हा एमएस धोनीच्या शाळेतील विद्यार्थी आहे. अप्रतिम खेळी केलीस दीपक चाहर.” तर दुसऱ्या एका युजरने ट्विट करत लिहिले की, “तुम्हाला या खेळाडूबद्दल वाईट वाटेल, ज्याने सामना पूर्णपणे बदलून टाकला. अप्रतिम खेळी केलीस दीपक चाहर.” तसेच आणखी एका युजरने ट्विट करत लिहिले की, “चांगला खेळलास दीपक चाहर. श्रीलंकेविरुद्ध ६९, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५४, दोन्ही खेळ्या धावांचा पाठलाग करत असताना.”

तर झाले असे की, ३८ वे षटक झाल्यानंतर दीपक चाहर फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्यावेळी भारतीय संघाला ७८ चेंडूत ९३ धावांची आवश्यकता होती. दीपक चाहर आणि सुर्यकुमार यादव खेळपट्टीवर टिकून होते. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि जयंत यादव बाद होऊन माघारी परतले होते. हे दोघेही बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा डाव कोलमडला होता.

भारतीय संघाला ४२ चेंडूत ५७ धावांची आवश्यकता होती. परंतु दीपक चाहरने माघार न घेता सामना भारतीय संघाच्या दिशेने खेचून आणला. त्याने दक्षिण आफ्रिकी गोलंदाजाच्या एका षटकात सलग २ षटकार मारले. त्यानंतर चौकार मारायला सुरुवात केली. त्याने जसप्रीत बुमराहसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. परंतु त्याला भारतीय संघाला सामना जिंकून देता आला नाही.

महत्वाच्या बातम्या :

आख्खी टीम राष्ट्रगीतात मग्न असताना विराटचं सुरू होतं भलतंच काही, पाहून प्रचंड संतापले चाहते

भारतीयांची मनचं लई मोठी! शतकवीर डी कॉकची बुमराहने थोपटली पाठ, कर्णधार राहुलकडूनही कौतुक

हे नक्की पाहा:

आज फारसे कुणाच्या लक्षात नसलेले टीम इंडियाचे एकेकाळचे पाच T20 Opener

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---