---Advertisement---

‘बेबी एबी’वर चॅम्पियन संघाने लावली बोली , डिविलियर्ससह ट्विटरवर आल्या अशा प्रतिक्रिया

On: रविवार, फेब्रुवारी 13, 2022 11:44 AM
dewald- brevis
---Advertisement---

नुकताच संपन्न झालेल्या आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंचा जलवा पाहायला मिळाला होता. त्यापैकीच एक खेळाडू म्हणजे, दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षाखालील संघातील खेळाडू डेवाल्ड ब्रेवीस ( dewald brevis). आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये डेवाल्ड ब्रेवीससाठी चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. अखेर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians)  बाजी मारत त्याला आपल्या संघात स्थान दिले आहे.

मुंबई इंडियन्स संघाने त्याला आगामी आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी ३ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. डेवाल्ड ब्रेवीसने आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक ५०६ धावा केल्या होत्या. त्याचा आवडता संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आहे. परंतु त्याला मुंबई इंडियन्स संघाने आपल्या संघात स्थान दिले आहे.

बेबी एबी’चे मुंबई संघात आगमन झाल्यानंतर चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रीया

एबी डिविलियर्सच्या शैलीने फलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा बेबी एबी आता मुंबई इंडियन्ससाठी खेळताना दिसून येणार आहे. त्याचे मुंबई संघात आगमन झाल्यानंतर एका चाहत्याने ट्विट करत लिहिले की, “टॉप टॅलेन्ट, तुला निळ्या आणि सोनेरी रंगाच्या जर्सित खेळताना पाहण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही.” तर एका यूजरने लिहिले की, “मला नाही माहित की, आरसीबीने हसरंगा आणि फाफ वर इतके पैसे का खर्च केले. त्यांनी बेबी एबी,डेविड वॉर्नर आणि युझवेंद्र चहलला घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता.” तसेच आणखी एका युजरने ट्विट करत लिहिले की, “मुंबईत तुझे स्वागत आहे बेबी एबी…”

https://twitter.com/TheAsh_18/status/1492522461488762880?t=Ehar9WnbtB1GVxE2y23l1w&s=19

https://twitter.com/__r_a_h_u_l___/status/1492498014077743104?t=0okg0gfnVQQ9Tuf_fmeW5A&s=19

https://twitter.com/UP72_Abhishek/status/1492499145365798914?t=jEtoPvHmrpHJCdP7PlaSaw&s=19

मुंबई इंडियन्सने बेबी एबीसह ईशान किशनला देखील पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स संघात स्थान दिले आहे. त्याच्यावर १५ कोटी २५ लाखांची बोली लावण्यात आली होती. यासह तो आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.

महत्वाच्या बातम्या

‘सुपरफास्ट मावी’ पुन्हा कोलकाताचा ‘नाईट रायडर’; तब्बल ‘इतक्या’ रकमेची लागली बोली 

राहुल नाम तो सुना होगा! ९ कोटींची घसघशीत कमाई‌ करत तेवतिया बनला ‘या’ संघाचा भाग

मोठ्या रकमेची अपेक्षा असताना ‘या’ युवा खेळाडूंना मानावे लागले कमी किमतीत समाधान

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---