---Advertisement---

‘कष्टाचे मिळाले फळ!’ ऋतुराज गायकवाड, वेंकटेश अय्यरला टीम इंडियात संधी मिळाल्याने सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा ओघ

---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समीतीने शुक्रवारी (३१ डिसेंबर) दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी १८ जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली. या संघात मध्यप्रदेशचा अष्टपैलू वेंकटेश अय्यर याला पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. याशिवाय महाराष्ट्र संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड यालाही या संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. त्यामुळे या दोघांवरही सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अय्यर आणि ऋतुराज या दोघांसाठीही नुकतीच पार पडलेली विजय हजारे ट्रॉफी २०२१-२२ ही स्पर्धा यशस्वी ठरली होती. अय्यरने या स्पर्धेत ६ सामन्यात ३७९ धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने २ शतके आणि १ अर्धशतक झळकावले होते. याशिवाय त्याने ९ विकेट्स देखील घेतल्या होत्या.

त्याला यापूर्वी मायदेशात झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघात संधी देण्यात आली होती. त्याने आयपीएल २०२१ स्पर्धेत देखील चांगली कामगिरी केली होती. त्याने १० डावात ३७० धावा केल्या होत्या. यात त्याच्या ४ अर्धशतकांचा समावेश होता. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२२ साठी ८ कोटी रुपयांची किंमत मोजत संघात कायम केले आहे.

अय्यरशिवाय ऋतुराजसाठीही २०२१ वर्ष दरदार ठरलं आहे. त्याने विजय हजारे ट्रॉफी २०२१-२२ स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४ शतकांसह ६०३ धावा केल्या. तसेच याचवर्षी त्याने श्रीलंकेविरुद्ध वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पणही केले. इतकंच नाही, तर आयपीएल २०२१ मध्ये तो सर्वाधिक धावा करणाराही खेळाडू ठरला. त्याने १६ डावात ६३५ धावा केल्या. यात त्याच्या एका शतकाचा आणि ४ अर्धशतकांचा समावेश होता. इतकंच नाही, तर त्याला चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या १५ व्या हंगामासाठी ६ कोटी रुपयात संघात कायम केले आहे.

या दोघांनी २०२१ मध्ये केलेल्या कामगिरीचे फळ त्यांना वर्षाखेरीस मिळाले असल्याने ट्वीटरवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

https://twitter.com/MAHIRAT_25Ander/status/1477134317201477635

https://twitter.com/Cric_Tushar/status/1475528337615310849

https://twitter.com/AishuMSD7/status/1476970142307274752

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात शिखर धवन आणि युजवेंद्र चहलला देखील संधी देण्यात आली आहे. त्यांचे अनेक दिवसांनंतर भारताच्या संघात पुनरागमन झाले असून आर अश्विन देखील ४ वर्षांनंतर वनडेमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज असेल. याशिवाय नियमित वनडे कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याने मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे या मालिकेत भारताचे नेतृत्त्व केएल राहुलच्या हाती असेल, तर जसप्रीत बुमराह उपकर्णधार असणार आहे.

ही मालिका १९ जानेवारीपासून सुरु होणार असून २१ आणि २३ जानेवारी रोजी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा वनडे सामना होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रिषभ पंत, इशान किशन, युजवेंद्र चहल, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज

महत्त्वाच्या बातम्या – 

भान हरपून नाचायचंय, तर रणवीर सिंग अन् रवी शास्त्रींचा ‘हा’ व्हिडिओ पाहाच, सर्वांचेच वेधलंय लक्ष

नवीन वर्षातील पहिलेच आंतरराष्ट्रीय शतक झळकावण्याचा पराक्रम केलाय ‘या’ पठ्ठ्याने

‘विराटला टी२० कर्णधारपद सोडू नको, असं सांगण्यात आले होते’, निवड समीती प्रमुखांकडून स्पष्टीकरण

टीम इंडियाला सोडलं, पण एअरपोर्टवर एकट्या हरभजनला पकडलं | HARBHAJAN FINED IN NEW ZEALAND

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---