---Advertisement---

‘अविस्मरणीय क्षण!’, भारतीय महिला हॉकी संघावर ऐतिहासिक विजयानंतर कौतुकाचा वर्षाव, पाहा काही खास ट्विट

On: सोमवार, ऑगस्ट 2, 2021 11:34 PM
---Advertisement---

सध्या सर्वत्र टोकियो ऑलिम्पिकची चर्चा सुरू आहे. त्यातच सोमवारी (१ ऑगस्ट) भारतीय महिला हॉकी संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलिया महिला संघाला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतीय महिला संघाने १-० अशा फरकाने उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलिया महिला संघाचा पराभव केला आणि ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच उपांत्य फेरीत जागा पक्की केली. त्यामुळे सर्व भारतातून राणी रामपाल कर्णधार असलेल्या हॉकी संघाचे कौतुक होते आहे.

या सामन्यात भारताकडून एकमेव गोल २२ व्या मिनीटाला गुरजीत कौरने केला. याच गोलसह गुरजीत कौरचा टोकियो ऑलिम्पिकमधील पहिलाच गोल झाला. हा गोलने मिळवलेली आघाडी राखण्यात भारतीय संघ नंतर यशस्वी ठरला आणि इतिहास घडवला. त्यामुळे या विजयानंतर सोशल मीडियावर लोकांनी भारतीय महिला संघावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

भारताच्या अनेक खेळाडूंनी भारतीय हॉकी संघाचे कौतुकाचे गोडवे गायले आहेत. भारताचा सलामीवीर विरेंद्र सेहवागने म्हटले आहे की ‘एखाद्या विजयानंतर इतका जास्त आनंद क्वचितच झाला असेल. अविस्मरणीय क्षण. आपल्या मुलींसाठी पहिली ऑलिम्पिकची उपांत्य फेरी. अभिमान वाटत आहे.’

केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनीही संघाचे कौतुक केले आहे. तसेच अभिनव बिंद्रा, व्हीव्हीएस लक्ष्मण, झुलन गोस्वामी, राजवर्धन राठोड, सुनील छेत्री, रिषभ पंत अशा अनेकांनी कौतुक केले आहे.

आता उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवत भारतीय महिला हॉकी संघाने भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये आणखी एक पदक मिळवून देण्याचे स्वप्न जिवंत ठेवले आहे. आता भारताचा उपांत्य फेरीतील सामना ४ ऑगस्ट रोजी अर्जेंटिनाविरुद्ध होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

ऑस्ट्रेलिया संघात मोठे फेर बदल! ‘हा’ खेळाडू झाला नवा कर्णधार

ट्विटरवर आमने-सामने आले पडद्यावरील आणि प्रत्यक्षातील ‘कबीर खान’; झाले ‘असे’ संभाषण

टोकियो ऑलिम्पिक: सोमवारी ‘अशी’ राहिली भारताची कामगिरी; ११ व्या दिवसाचे असणार ‘असे’ वेळापत्रक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---