महेंद्रसिंग धोनी जगातील महान क्रिकेटपटूंपैकू एक आहे. धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली आयसीसीच्या तीनही स्वरुपातील स्पर्धेत भारताला चषक जिंकून दिले आहेत. धोनी हा मैदानात कोणतीही परिस्थिती एकदम शांतपणे हाताळतो. त्यामुळे त्याला ‘कॅप्टनकूल’ असेही म्हटले जाते. आपली प्रतिभाशाली कामगिरी आणि शांत स्वभावाने धोनीने असंख्य चाहत्यांना प्रभावित केले आहे. सोशल मीडियापासून अंतर बनवून ठेवणारा धोनी बऱ्याचदा कोणत्या-ना-कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतो.
नुकतेच ट्विटरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन ब्लू टिक हटवल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. चाहत्यांच्या रोषाला पाहून तासाभरात ट्विटरने पुन्हा त्याच्या अकाउंटपुढे ब्लू टिक लावली. यानंतरही धोनीचा चाहतावर्ग ट्विटरवरच ट्विटरची मजा घेताना दिसत आहे.
अमेरिकास्थित ट्विटर हा जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक मानला जातो. नामांकित लोक व सेलिब्रिटी यांचे अकाउंट सहज ओळखता यावे याकरता ट्विटर त्यांच्या नावापुढे निळ्या रंगाची बरोबरची खूण असलेले चिन्ह (ब्लू टिक) लावते.
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याच्या नावापुढील ही ब्लू टिक ट्विटरकडून हटवली गेली होती. ट्विटरच्या पॉलिसीनुसार कोणताही ब्लू टिक असलेला ट्विटर वापरकर्ता सहा महिने ट्विटरवर सक्रीय नसल्यास त्याची ब्लू टिक हटविण्यात येते. धोनीने आपले अखेरचे ट्वीट ८ जानेवारी रोजी केले होते. त्या नियमानुसार ही ब्लू टिक हटविली गेल्याचे सांगण्यात येत आहे. धोनी सहसा सोशल मिडियाचा जास्त वापर करत नाही. त्याची पत्नी साक्षी ही इंस्टाग्रामच्या माध्यमातून धोनीची छायाचित्रे शेअर करत असते. सध्या धोनीचे ट्विटरवर ८.२ मिलियन अनुसारक आहेत.
यानंतर ट्विटरवर ब्लू टिक परत लावण्याच्या मागणीने जोर धरला होता. अखेर ट्विटरने त्यांच्या मागणीपुढे गुडघे टेकले आणि पुन्हा धोनीच्या अकाउंटपुढे ब्लू टिक लावली. यानंतरही काहींनी ट्विटरवर निशाणा साधला आहे. ट्विटर धोनीला घाबरले अशा शब्दांत काहींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
https://twitter.com/SanProsperity/status/1423635191818383362?s=20
https://twitter.com/ItzHrshvrdhn/status/1423635725044523009?s=20
#MSDhoni Thala blue tick id back
Indian fan :- Twitter Dar gya re baba pic.twitter.com/GMpwDRfDCv
— sachin yadav (@sachinyadav_00) August 6, 2021
Raina going to twitter office to get blue tick for ms dhoni Blue heart#blueTick #MSDhoni pic.twitter.com/3Us3tJ3N8V
— Ankit singh (@Ankitku15995287) August 6, 2021
MSD doesn't need blue tick..Its the blue tick that needs MSD
— Abhi (@abhishekyel) August 6, 2021
#MSDhoni's 'deleted' blue tick restored by Twitter.
Gambheer reaction: 😂 pic.twitter.com/aWhzfoAZGG
— Sugam Tripathi (@Sugamcasm) August 6, 2021
दरम्यान धोनी १९ सप्टेंबरपासून युएई येथे होणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या सत्रातील उर्वरित सामन्यांच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे धोनीचे चाहते त्याला पुन्हा खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार आहे. पहिल्या सत्रात त्याच्या संघाने ७ सामन्यांपैकी ५ सामने जिंकले आहेत. १० गुणांसह चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.
महत्वाच्या बातम्या –
-ट्विटरने अचानक हटवली माहीच्या अकाउंटवरची ‘ब्लू टिक’; मग झालं असं काही की, लगेच सुधारली चूक
–‘आम्ही मान्य करतो की पंत सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे,’ विरोधी संघाच्या अव्वल गोलंदाजाकडून स्तुती
–अर्धशतक पूर्ण करताच मोठा फटका मारण्याच्या नादात ‘असा’ बाद झाला रविंद्र जडेजा, पाहा व्हिडिओ