बीसीसीआयने सोमवारी(24 डिसेंबर) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
या मालिकांसाठी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र रिषभ पंतला वनडे मालिकांमधून वगळण्यात आले आहे. पण पंत न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघातील स्थान टिकवून आहे. तसेच दिनेश कार्तिकला वनडे आणि टी20 असे दोन्ही संघान स्थान मिळाले आहे.
यादरम्यान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा झाल्याचे आयसीसीने ट्विट करताना म्हटले की रिषभ पंतला भारताच्या दोन्ही मर्यादीत षटकांच्या मालिकांमधून वगळण्यात आले आहे.
आयसीसीने रिषभ पंतबद्दल केलेल्या या चूकीच्या ट्विटमुळे चाहत्यांनी आयसीसीवर हल्लाबोल करत टीका केली आहे. आयसीसीने चूक लक्षात येताच लगेचच ते चूकीचे ट्विट डिलिट केले आहे.
I see Rishab pant name in the squad and headline says he is out 🤔🤔
— Swamy Battula (@SwamyBathula) December 24, 2018
Icc😂😂 Pant is in t20
— Ujwal Chahande (@Ujwal_C15) December 24, 2018
https://twitter.com/AnkitS_ingh/status/1077174017717559296
U r wrong dear admin… Rishab Pant also in T20I sqaurd against New Zeland
— Tapas Jena 🇮🇳 (@tapaskumarjena) December 24, 2018
Come On @icc, Rishabh is there in the T20 squad for NZ !
— Danish Khan (@danishkhan_30) December 24, 2018
Pant is there in the T20 squad
— Vianney Cecil (@VianneyCecil) December 24, 2018
Who is posting this… ??
@RishabPant777 is in T20 squad https://t.co/JnLyY1RlX9
— Misal (@MisalRaj_) December 24, 2018
Plz chk with @BCCI, @RishabPant777 back his seat in t 20 against @BLACKCAPS
— Shashank (@Shashank16Feb) December 24, 2018
Rishab Pant is available for New Zeland T20I squad.
— SYED IBRAHIM KHALEEL (@IAMSYEDKHALEEL) December 24, 2018
धोनीला याआधी विंडीज आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेतून वगळण्यात आले होते. त्याच्या ऐवजी पंतला संधी देण्यात आली होती. मात्र या टी20 मालिकांमध्ये पंतला खास काही करता आले नाही. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेसाठी धोनीचे भारताच्या टी20 संघात पुनरागमन झाले आहे.
पण त्याचबरोबर या टी20 मालिकेसाठी धोनीला पर्याय म्हणून रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांनाही टी20 संघात कायम करण्यात आले आहे. असे असले तरी पंतला वनडे संघातील स्थान गमवावे लागले आहे.
भारतीय संघ 12,15 आणि 18 जानेवारीला अनुक्रमे सिडनी, अॅडलेड आणि मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामने खेळणार आहे. तसेच त्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध 23,26,28, 31 जानेवारी आणि 3 फेब्रुवारी असे पाच वनडे सामने होणार आहेत. त्यानंतर 6,8 आणि 10 फेब्रुवारीला टी20 सामने होणार आहेत.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –
विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, मोहम्मद शमी.
न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –
विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद.
महत्त्वाच्या बातम्या:
–टीम इंडियाचा अजिंक्य रहाणे एक चांगला कर्णधार होऊ शकतो
–मिशेल जाॅन्सन प्रकरणात टाईम्स ऑफ इंडिया क्रीडा पत्रकाराच्या मागे ठाम उभे
–खेळाडू संघसहकाऱ्याच नावच विसरला, म्हणाला त्याला देवाने लवकर बरं करो