रविवारी(24 फेब्रुवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात विशाखापट्टणम येथे पहिला टी20 सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवत दोन सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यानंतर भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव यांच्यावर ट्विटरवर जोरदार टीका झाली आहे. तसेच अनेकांनी भारताच्या या पराभवासाठी या दोघांना जबाबदार धरले आहे.
या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 126 धावाच करता आल्या. यावेळी भारताच्या महत्त्वाच्या विकेट पडल्यानंतर पाचव्या क्रमांकावर खेळायला आलेल्या धोनीला 78.38 च्या स्ट्राइक रेटने 37 चेंडूत नाबाद 29 धावाच करता आल्या. त्याच्या धावा धीम्या गतीने आल्याने त्याच्यावर ही टीका होत आहे.
भारताच्या महत्त्वाच्या विकेट पडल्यानंतर धोनीकडून चाहत्यांना आक्रमक खेळाची आपेक्षा होती. पण धोनीला त्याच्या खेळीत फक्त एकच षटकार मारता आला. हा षटकारही त्याने शेवटच्या षटकात मारला होता. पण या षटकारानंतरही या शेवटच्या षटकात 8 धावाच भारताला करता आल्या. तसेच धोनीने अखेरच्या काही षटकात एकेरी धाव घेण्यासही नकार दिला होता. त्यामुळेही धोनीवर टीकेचा मारा होत आहे.
त्याचबरोबर 126 धावांचे रक्षण करताना भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला मोठे फटके मारण्यापासून रोखले होते. तसेच 19 व्या षटकात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या 2 विकेट्स घेत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या.
मात्र शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 14 धावांची गरज असताना उमेश यादवच्या गोलंदाजीवर पॅट कमिन्स आणि झाय रिचर्डसनने या 14 धावा करत ऑस्ट्रेलियाला 3 विकेट्सने विजय मिळवून दिला. यावेळी कमिन्स आणि रिचर्डसन यांनी या षटकात दोन चौकार मारले. त्यामुळे उमेश यादववरही टीकेची झोड उठली आहे.
या सामन्यात उमेश यादवने 4 षटकात 35 धावा दिल्या. तसेच त्याला एकही विकेट घेण्यात यश आले नाही.
अशी होत आहे धोनी आणि उमेशवर टिका
महत्त्वाच्या बातम्या-
-पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहताना विराटने चाहत्यांना दिला शांत रहाण्याचा सल्ला
-आजच्याच दिवशी क्रिकेटच्या डाॅनने घेतला होता अखेरचा श्वास
-मुंबईकर पृथ्वी शाॅची जाळ आणि धुर खेळी, षटकार- चौकारांची बरसात






