---Advertisement---

कन्फ्युजन ही कन्फ्युजन! बाद नसतानाही सूर्यकुमार चालू लागला होता तंबूची वाट, जाणून घ्या पूर्ण प्रकरण

On: शनिवार, जुलै 24, 2021 12:56 AM
---Advertisement---

श्रीलंका आणि भारत यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना कोलंबो येथे खेळवण्यात आला. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना केवळ २२५ धावा बनवू शकला. त्यानंतर, श्रीलंकेला पावसाच्या व्यत्ययामुळे विजयासाठी २२७ धावांचे लक्ष मिळाले. जे श्रीलंकेने ९ षटके राखून पार केले. दरम्यान भारतीय संघाच्या डावावेळी सूर्यकुमार यादवला पंचांनी पायचित दिल्यानंतर सोशल मीडियावर चांगलीच राळ उडाली. या प्रकरणामुळे चाहत्यांनी मैदानी पंच व तिसरे पंच यांना धारेवर धरले.

अशी घडली घटना
भारतीय डावातील २३ वे षटक श्रीलंकेकडून युवा फिरकीपटू प्रवीण जयविक्रमा टाकत होता. या षटकातील पहिला चेंडू सूर्यकुमारच्या पॅडवर आदळला. त्यानंतर श्रीलंकन खेळाडूंनी जोरदार अपील केले. मैदानी पंच असलेल्या कुमार धर्मसेना यांनी सुर्यकुमारला बाद घोषित केले. पंचाच्या या निर्णायाला आव्हान देत सूर्यकुमारने डीआरएस घेत तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली.

आणि मैदानात उडाला गोंधळ
निर्णय देण्याची जबाबदारी तिसऱ्या पंचांकडे गेले असता मैदानात वेगळाच गोंधळ पाहायला मिळाला. पंचांनी त्या चेंडूचा रिप्ले पाहीला असता, रिप्लेमध्ये चेंडू यष्ट्यांना लागलेला दिसत होता. त्यामुळे, पंचांचा निर्णय आधीच श्रीलंकन खेळाडूंनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांचा हा जल्लोष क्षणभंगुर ठरला. दरम्यान, सूर्यकुमार तंबूकडे चालू लागला होता.

परंतु, चेंडू इम्पॅक्ट लाईनमध्ये पडलाच नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिसऱ्या पंचांनी सुर्यकुमारला नाबाद ठरवले. सुर्यकुमारला या निर्णयाचा फटका बसला नसला तरी, चाहत्यांनी सोशल मीडियावर कुमार धर्मासेना व तिसऱ्या पंचांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. (Twittter slams umpires after declare suryakumar yadav out in 3rd odi)

अशा आल्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया
यावर प्रतिक्रिया देताना एका ट्विटर खात्यावरून त्या घटनेचे छायाचित्र पोस्ट केले गेले. ज्याला कॅप्शन देताना लिहिले, ‘सुर्यकुमारचे भाव सर्व काही सांगून जातात. हा निर्णय किती नजीकचा होता.’

त्यासोबतच भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने आपल्या नेहमीच्या अंदाजात मी शेअर करून पंचांना ट्रोल केले.

सूर्यकुमारने या सामन्यात ४० धावा केल्या. तसेच त्याला या वनडे मालिकेचा मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याने या मालिकेतील तीन सामन्यात अनुक्रमे नाबाद ३१, ५३ आणि ४० धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

पहिल्या आंतरराष्ट्रीय विकेटचा आनंद, कृष्णप्पा गौतमचा ‘तो’ व्हिडिओ झाला व्हायरल

मोठ्या मनाचा द्रविड! श्रीलंकन कर्णधाराला तिसऱ्या सामन्यात केले मार्गदर्शन, फोटो होतायेत व्हायरल

भारताने २१ व्या स्थानी केले ऑलिम्पिक उद्घाटनात संचलन; ‘या’ आगळ्यावेगळ्या नियमानुसार ठरते संचलनातील देशांची क्रमवारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---