कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर बुधवारी (२५ मे) इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल २०२२) एलिमिनेटर सामना रंगला होता. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने लखनऊ सुपर जायंट्स संघाचा १४ धावांनी पराभव करत दुसरी क्वालिफायर फेरी गाठली. यावेळी रजत पाटीदारची नाबाद शतकीय खेळी महत्वाची ठरली.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या बेंगलोरने पहिल्या तीन विकेट्स लवकर गमावल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या रजत पाटीदार (Rajat Patidar) याने २०७.४१च्या स्ट्राईक रेटने ५४ चेंडूत नाबाद ११२ धावा केल्या. यात त्याने १२ चौकार आणि ७ षटकार मारले. त्याच्या या शतकाने बेंगलोरने २० षटकात ४ विकेट्स गमावत २०७ धावसंख्या उभारली.
पाटीदारच्या शतकाने या आयपीएल हंगामालाही वेगळेच रूप आले आहे. त्याच्या या झंझावाती शतकानंतर दोन नवीन विक्रम रचले गेले. त्यातील पहिला विक्रम असा की, आयपीएलच्या एकाच हंगामात सर्वाधिक अशी सात शतकांच्या विक्रमाची बरोबरी झाली आहे. या हंगामात सात शतके झाली असून २०१६च्या हंगामातही सात शतके मारली होती.
आयपीएलच्या एकाच हंगामात सर्वाधिक शतके
१. आयपीएल २०२२: सात शतके*
२. आयपीएल २०१६: सात शतके
३. आयपीएल २००८: सहा शतके
४. आयपीएल २०११: सहा शतके
५. आयपीएल २०१२: सहा शतके
६. आयपीएल २०१९: सहा शतके
त्याबरोबर आतापर्यंत आयपीएलमध्ये शतक करणाऱ्या खेळाडूंंमध्ये बेंगलोरचाच बोलबाला दिसला आहे. त्यांच्या नावावर एकूण १५ शतके आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक करणारे संघ
१. रॉयल चॅलेेंजर्स बेंगलोर – १५ शतक*
२. पंजाब किंग्ज – १३ शतक
३. राजस्थान रॉयल्स – १२ शतक
४. दिल्ली कॅपिट्ल्स – १० शतक
५. चेन्नई सुपर किंग्ज – ९ शतक
आयपीएलच्या इतिहासात सर्वप्रथम शतक हे ब्रेंडन मॅक्युलमने मारले आहे. त्याने २००८च्या पहिल्या हंगामात कोलकाताकडून खेळताना बेंगलोर विरुद्ध नाबाद १५८ धावा केल्या होत्या.
मनीष पांडे हा आयपीएलमध्ये शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्याने २००९च्या हंगामात बेंगलोरकडून खेळताना डेक्कन चार्जर्स विरुद्ध नाबाद ११४ धावा केल्या होत्या.
बेंगलोरकडून खेळणारा विराट कोहली हा आयपीएलच्या एकाच हंगामात चार शतके करणारा एकमेव फलंदाज ठरला आहे. त्याने २०१६च्या हंगामात ही कामगिरी केली आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लखनऊने गमावली पदार्पणातील IPL हंगाम गाजवण्याची संधी, ‘या’ ३ चुकांमुळे गमावला Eliminator सामना
दीपक हुड्डाचा झेल पकडण्याच्या नादात पोलीस अधिकारी जखमी; व्हिडिओ जोरदार व्हायरल
अनसोल्ड खेळाडू ते मॅच विनर, लखनऊविरुद्ध शतक ठोकणारा आरसीबीचा रजत पाटीदार; वाचा त्याच्याबद्दल