Wednesday, February 1, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 विकेट्स घेणारे दोन गोलंदाज, दुसरे नाव आहे चकीत करणारे

October 24, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/@ICC

Photo Courtesy: Twitter/@ICC


टी२० विश्वचषक २०२२ ऑस्ट्रेलियात खेळला जात आहे. यावर्षी विश्वचषकात एकून १६ संघांनी सहभाग घेतला आहे आणि सर्व संघांनी त्यांच्या उत्कृष्ठ खेळाडूंना संधी दिली आहे. टी-२० क्रिकेटमध्ये आपण नेहमी फलंदाजांचे वर्चस्व पाहिले आहे. असे असले तरी काही गोलंदाज असतात जे त्यांच्या उत्कृष्ठ प्रदर्शनाच्या जोरावर समोरच्या फलंदाजाला जास्त धावा करू देत नाही. तसेच काही गोलंदाज संघासाठी विकेट्स घेऊन स्वत:च्या नावावर नवीन विक्रमही नोंदवतात.

टी-२० क्रिकेटमध्ये विक्रमांचा विचार केला तर, आपण या लेखात अशाचा दोन गोलंदाजांची माहिती घेणार आहोत, ज्यांनी टी-२० मध्ये सर्वाधिक वेगवान ५० विकेट्स पूर्ण केले आहेत.

१. अजंता मेंडिस (श्रीलंका)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००८ मध्ये श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज अजंता मेंडिसने इतर देशातील फलंदाजांना चांगलेच हैराण करून सोडले होते. त्याने केवळ मर्यादित षटकांमध्येच नाही, तर क्रिकेटच्या तिनही प्रकारांमध्ये चांगले प्रदर्शन केले होते आणि फलंदाजांना हैराण केले होतो. त्याने त्याच्या कारकिर्दीत एकूण ३९ टी-२० सामने खेळले आहेत आणि यामध्ये ६.४५ च्या इकॉनमीने गोलंदाजी केली आहे.

त्याने खेळलेल्या टी-२० सामन्यांमध्ये तीन वेळा चार विकेट्स आणि दोन वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या या प्रदर्शनाच्या जोरावर टी-२० मध्ये त्याने एकूण ६६ विकेट्स त्याच्या नावावर कल्या आहेत. त्याने टी-२० मधील त्याच्या ५० विकेट्स अवघ्या २६ सामन्यांमध्येच पूर्ण केल्या होत्या. त्याचा हा विक्रम आजपर्यंत अबाधित आहे.

२. मार्क एडेयर (आयर्लंड)
आयर्लंड संघाला टी-२० विश्वचषक खेळण्यासाठी स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत खेळावे लागले आणि त्यानंतर त्यांची निवड सुपर १२ संघांमध्ये झाली. मागील वर्षी झालेल्या टी20 विश्वचषकात आयर्लंडला सुपर 12मध्ये पोहोचण्यासाठी प्राथमिक फेरीत खेळावे लागले. त्यावेळी आयर्लंडने काही दिवसांपूर्वी सुपर १२ मध्ये जागा मिळवण्यासाठी नेदरलँडसोबत सामना खेळला. या सामन्यात नेदरलँडने प्रथम फलंदाजी केली आणि आयर्लंडचा अष्टपैलू मार्क एडेयरने चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने या सामन्यात ३ विकेट्स घेतल्या. हा सामना मार्कच्या कारकिर्दीतील २८ वा टी-२० सामना होता आणि त्याने या सामन्यात तीन विकेट्स घेऊन टी-२० प्रकातील त्याच्या ५० विकेट्स पूर्ण केल्या.

ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषकात एडेयर संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. आतापर्यंत  त्याने ५५ सामन्यांमध्ये ७.५९ च्या इकॉनमी रेटने गोलंदाजी करत ७५ विकेट्स घेतल्या आहेत.

आजही टी-२० मध्ये सर्वाधिक वेगवान ५० विकेट्स पूर्ण करण्याच्या यादीत मेंडिस आणि एडेयर अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“रिमेंबर द नेम, कार्लोस ब्राथवेट” या ऐतिहासिक शब्दांचे जनक इयान बिशप्स
कौशल्याच्या बाबतीत भारताचा अव्वल यष्टीरक्षक ‘सुपरमॅन साहा’


Next Post
Photo Courtesy: Twitter/@BCCI

वाढदिवस विशेष- क्रिकेटर वृद्धिमान साहा

Rahul Dravid Celebration

शांत द्रविडचे भन्नाट सेलेब्रेशन! आयसीसीने शेयर केलायं व्हिडिओ, एकदा पाहाच

Virat kohli v pak

विश्वचषकांमध्ये विराटचं झळकतो! डिविलियर्सला मागे टाकत केला 'हा' अनोखा रेकॉर्ड

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143