भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर दोन वर्षांपेक्षा जास्त काळ झाला. पण अजूनही त्याची लोकप्रियता मात्र जराही कमी झाली नाहीये. बुधवारी (12 एप्रिल) पुन्हा एकदा याच गोष्टीचा प्रत्यय आला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर धोनीला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. सोपतच राजस्थानविरुद्धचा हा सामना ऑनलाईन पाहणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय होती.
चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थानर रॉयल्स (Chennai Super Kings vs Rajasthan Royals) यांच्यातील हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत पाहिला गेला. विजयासाठी चेन्नईला 176 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे धोनीला गाठता आले नाही. शेवटच्या चेंडूवर एमएस धोनी (MS Dhoni) स्ट्राईकवर होता आणि सीएसकेला विजयासाठी 5 धावा हव्या होत्या. वेगवान गोलंदाज संदी शर्माला शेवटच्या षटकात दोनीने दोन षटकार मारले, पण शेवटच्या चेंडू मात्र त्याला चौकार किंवा षटकार मारता आला नाही. शेवटच्या चेंडू संदीप शर्माने जबरदस्त यॉर्कर टाकला, जो आपल्या हेलिकॉप्टर शॉटसाठी ओळखल्या जाणाऱ्या धोनीला देखील खेळता आला नाही. असे असले तरी, चाहत्याेंना मात्र शेवटपर्यंत धोनीवर विश्वास होता.
शेवटच्या षटकात खासकरून शेवटच्या चेंडूवर चाहते डोळ्यात अगदी तेल घालून धोनीकडे पाहत होते. यावेळा स्टार स्पोर्ट्स चॅनलवर तब्बल 5.6 कोटी चाहते हा सामना लाईव पाहत होते. तर जीओ सिनेमावर (Jio Cinema) तब्बल 2.2 कोटी चाहते हा थरार पाहत होते. हा सामना लाईव्ह पाहणाऱ्यांची संघ लक्षणीय असून यातून चाहत्यांचे धोनीवर असलेले प्रेम लक्षात येते.
For one moment, 2.2 Cr Indians held their breath. Old memories rushed back. A familiar expectation took over.
It didn't quite end like it used to but for one moment, time stood still for 20 million+ people.
One moment. One MS Dhoni. #IPLonJioCinema #TATAIPL #IPL2023 #CSKvRR pic.twitter.com/joo2Qm24Ve
— JioCinema (@JioCinema) April 12, 2023
सामन्याचा एकंदरीच विचार केला, तर सीएसकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आल्याला राजस्था रॉयल्स संघ 20 षटकात 8 बाद 175 धावा करू शकला. प्रत्युत्तरात सीएसकेने निर्धारित 20 षटकांमध्ये 6 बाद 172 धावा केल्या. धोनीने पुन्हा एकदा संघासाठी महत्वापूर्ण खेळी केली. त्याने 17 चेंडूत 188.23च्या स्ट्राईक रेटने नाबाद 32 धावा केल्या. तत्पूर्वी राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर या सामन्यात देखील चमकला. बटलरने 36 चेंडूत 52 धावांची ताबडतोड खेळी केली. (two crore fans watched the match live on Jio Cinemas to watch MS Dhoni’s last ball)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जड्डूची टी20 मध्ये ‘डबल सेंच्युरी’! रॉयल्सच्या डावाला ब्रेक लावत पार केला मैलाचा दगड
रोमांचक सामन्यात धोनीची झुंज अपयशी! तब्बल 15 वर्षानंतर राजस्थानची सीएसकेला चेपॉकवर मात