भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. तर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळली जाणार आहे. तत्पूर्वी आपण एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक ठोकणाऱ्या टाॅप-5 खेळाडूंची यादी पाहणार आहेत. ज्यामध्ये दोन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत अनेक खेळाडूंनी शतक ठोकले आहेत. परंतू एकदिवसीय क्रिकेटमध्ये काही खेळाडूच फक्त द्विशतक ठोकू शकले आहेत. आज आपण या बातमीद्वारे अशा टाॅप-5 खेळाडूंची यादी पाहणार आहोत. ज्यामध्ये 2 भारतीय खेळाडूंचा देखील समावेश आहे.
या यादीत भारताचा विस्फोटक सलामीवीर फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) शीर्ष स्थानी आहे. किशनने बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात 126 चेंडूत सर्वात वेगवान द्विशतक ठोकले होते. या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलचा समावेश आहे. मॅक्सवेलनं अफगाणिस्तानविरुद्ध 128 चेंडूत द्विशतकाचा आकडा गाठला होता.
श्रीलंकेचा पथुम निसांका या यादीमध्ये तिसऱ्या सथानावर आहे. निसांकाने अफगाणिस्तानविरुद्ध 136 चेंडूत विस्फोटक खेळी खेळून द्विशतक झळकावले होते. तर वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू ख्रिस गेल या यादीत चौथ्या स्थानावर आहे. ‘युनिवर्स बाॅस’ अशी ओळख असलेल्या गेलनं 138 चेंडूत झिम्बाब्वेविरुद्ध झंझावाती द्विशतक झळकावले होते. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान द्विशतक झळकावण्याच्या टाॅप-5 खेळाडूंच्या यादीत भारताचा दिग्गज सलामावीर वीरेंद्र सेहवाग पाचव्या स्थानी असून त्यानं वेस्ट इंडिजविरुद्ध 140 चेंडूत द्विशतकाचा आकडा गाठला होता.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान द्विशतक ठोकणारे टाॅप-5 खेळाडू
ईशान किशन (126 चेंडू) विरुद्ध बांगलादेश
ग्लेन मॅक्सवेल (128 चेंडू) विरुद्ध अफगाणिस्तान
पथुम निसांका (136 चेंडू) विरुद्ध अफगाणिस्तान
ख्रिस गेल (138 चेंडू) विरुद्ध झिम्बाब्वे
वीरेंद्र सेहवाग (140 चेंडू) विरुद्ध वेस्ट इंडिज
महत्त्वाच्या बातम्या-
व्हायचं होतं फलंदाज पण झाले मात्र गोलंदाज! या 2 भारतीय खेळाडूंची कहाणी खूपच रंजक
RCBला चॅम्पियन बनवणाऱ्या खेळाडूचा आज वाढदिवस…! भारतासाठीही ठोकल्या 7000+ धावा
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बुमराह हा किर्तीमान रचणाच्या उंबरठ्यावर, श्रीलंका दाैऱ्यासाठी मिळणार संधी?