---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बुमराह हा किर्तीमान रचणाच्या उंबरठ्यावर, श्रीलंका दाैऱ्यासाठी मिळणार संधी?

---Advertisement---

भारतीय संघाच्या श्रीलंका दाैऱ्याला 27 जुलै पासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया श्रीलंका विरुद्ध तीन सामन्याची टी20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर दोन्ही संघ तीन एकदिवसीय सामने आमने सामने येणार आहेत. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गाैतम गंभीरचा हेड कोच म्हणून या मलिकेपासून कार्यकाळाला सुरुवात होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात 27 जुलै ते 30 जुलै दरम्यान टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. यानंतर 2, 4 आणि 7 ऑगस्ट रोजी कोलंबोमध्ये तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील.

जसप्रीत बुमराहला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी20 मालिकेत खेळण्याची संधी मिळाली तर तो एक मोठा विक्रम रचू शकतो. 30 वर्षीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘400’ चा जादुई आकडा गाठण्याच्या जवळ आहे. जसप्रीत बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 बळींचा टप्पा गाठण्यापासून फक्त 3 विकेट्स दूर आहे. सध्या जसप्रीत बुमराहच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 397 विकेट्स घेण्याचा विक्रम आहे.

जसप्रीत बुमराह श्रीलंका विरुद्ध कोणतीही वनडे किंवा टी20 मालिका खेळला तर तो सहजपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 400 विकेट आकडा गाठू शकतो. बुमराहने आतापर्यंत 70 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 89 विकेट्स मिळवल्या आहेत. याशिवाय जसप्रीत बुमराहने टीम इंडियासाठी 36 टेस्ट मॅचमध्ये 159 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय जसप्रीत बुमराहने भारतासाठी आतापर्यंत 89 एकदिवसीय सामन्यांमध्ये 149 विकेट घेतल्या आहेत.

भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज

1. अनिल कुंबळे – 953 विकेट्स
2. रविचंद्रन अश्विन – 744 विकेट्स
3. हरभजन सिंग – 707 विकेट्स
4. कपिल देव – 687 विकेट्स
5. झहीर खान – 597 विकेट्स
6. रवींद्र जडेजा – 568 विकेट्स
7. जवागल श्रीनाथ – 551 विकेट्स
8. मोहम्मद शमी – 448 विकेट्स
9. इशांत शर्मा – 434 विकेट्स
10. जसप्रीत बुमराह – 397 विकेट्स

महत्तवाच्या बातम्या-

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बुमराह हा किर्तीमान रचणाच्या उंबरठ्यावर, श्रीलंका दाैऱ्यासाठी मिळणार संधी?
टी20 कर्णधारावरून वाद, जय शाह आणि गौतम गंभीरमध्ये बिनसलं?
आगामी श्रीलंकेदाैऱ्यापूर्वी केएल राहुल चर्चेत! मुंबईमध्ये खरेदी केले चक्क इतक्या किमतीचे घर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---