आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी अंपायर डेव्हलपमेंट पॅनेल अर्थात पंच विकास पॅनेलमध्ये भारताच्या दोन महिला पंचाचा समावेश केला आहे. यामध्ये जननी नारायणन (Janani Narayanan) आणि वृंदा राठी (Vrinda Rathi) या महिलांचा समावेश आहे. त्यामुळे आता आयसीसीमध्ये महिला पंचांची संख्या १२ झाली आहे.
३४ वर्षीय जननी २०१८ पासूनच देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये पंचाची भूमिका पार पाडत आहेत.
यावेळी जननी म्हणाली की, “आयसीसीच्या विकास पॅनेलमध्ये वृंदा आणि माझा समावेश झाला हे ऐकून खूप आनंद झाला आहे. यामुळे मला मैदानावरील वरिष्ठांकडून शिकण्याची आणि येत्या काही वर्षांत स्वत: ला सुधारण्याची संधी मिळेल. ९०च्या दशकापासून क्रिकेट हा माझ्या रोजच्या जीवनातील एक भाग बनला आहे. त्यामुळे मला उच्च स्तरावरील क्रिकेटमध्ये असेच सतत काम करत रहायचे आहे.
तसेच ३१ वर्षीय वृंदाने आपल्या कारकीर्दीची सुरुवात वेगवान गोलंदाज म्हणून केली. त्यानंंतर तिने पंचांची भूमिका साकारली. वृंदाही २०१८नंतर देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम पाहत आहे.
“मला असे वाटते की, आयसीसीच्या विकास पॅनेलमध्ये (ICC’s development panel) माझा समावेश असणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. कारण यामुळे माझ्या आयुष्यातील अनेक मार्ग खुले झाले आहेत. मला खात्री आहे की मला पॅनेलमधील सदस्यांकडून खूप काही शिकायला मिळेल,” असे वृंदा म्हणाली.
पुढे वृंदा म्हणाली, “मी क्रिकेट खेळले आहे आणि वेगवान गोलंदाज म्हणून काम केले आहे. ही माझ्यासाठी एक स्वाभाविक प्रगती होती. तसेच गोष्टी ज्यापद्धतीने समोर आल्या आहेत त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे.”
ट्रेंडिंग घडामोडी-
–कोरोनाने नुकसान तर केलंय, पण अशी होणार क्रिकेटमध्ये भरपाई
–टीम इंडियाचा शिलेदार कोरोना व्हायरस संपल्यावर पहिलं हे काम करणार