भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यादरम्यान गॅले येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ उपहारापर्यंत ११५ वर १ वर आहे.
सलामीवीर शिखर धवन ६४ धावांवर तर चेतेश्वर पुजारा ३७ धावांवर खेळत आहेत. दुसरा सलामीवीर अभिनव मुकुंद १२ धावांवर असताना ८व्या षटकात बाद झाला आहे.
अभिनव मुकुंद आणि शिखर धवन ही भारताची १५२ वी सलामीची जोडी होती तर केवळ तिसरी डावखुरी जोडी होती, यापूर्वी २००५ मध्ये दिल्ली कसोटीमध्ये गंभीर आणि इरफान पठाण तर २०११ मध्ये लॉर्डसवर गंभीर मुकुंद या डावखुऱ्या जोडीने सलामीला खेळ केला होता.