---Advertisement---

भारत-पाक सामन्यानंतर आयपीएलच्या दोन नव्या संघांवर होणार शिक्कामोर्तब? वाचा सविस्तर

On: गुरूवार, ऑक्टोबर 21, 2021 9:05 PM
---Advertisement---

जगभरातील क्रिकेटप्रेमी २४ ऑक्टोबर आणि कदाचित २५ ऑक्टोबरची देखील आतुरतेने वाट पाहत असतील. कारण येत्या २४ ऑक्टोबर रोजी टी२० विश्वचषक २०२१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळून आपल्या मोहिमेला सुरुवात करतील. सर्व क्रिकेट चाहते या दोन देशांमधील क्रिकेट सामन्याची वाट पाहत आहेत. तर, त्याच्या दुसऱ्याच दिवशी (२५ ऑक्टोबर) इंडियन प्रीमियर लीगचे २ नवीन संघासाठी विक्री करण्याची प्रक्रिया पार पडू शकते.

आयपीएलच्या पुढील हंगामात नवीन संघ दाखल होणार आहेत आणि ते २ नवीन संघ कोणते असतील हे जाणून घेण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. दरम्यान, अशी माहिती येत आहे की, २५ ऑक्टोबर रोजी दुबईमध्येच दोन नवीन आयपीएल संघासाठी विक्री करण्याची प्रक्रिया पार पडू शकते. एका माहितीनुसार, जवळजवळ २० उमेदवारांनी या २ नवीन फ्रँचायझींसाठी निविदांचे दस्तऐवज खरेदी केले आहेत.

लिलावासाठी संघाची मूळ किंमत २००० कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. अनेक मोठे गट आणि उद्योग समूहांनी या दोन नवीन फ्रँचायझींमध्ये रस दाखवला आहे. या मोठ्या नावांमध्ये मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबचे मालक ग्लेसर कुटुंब यांचाही समावेश आहे.

माहितीनुसार, मँचेस्टर युनायटेडचे ​​मालक जगातील सर्वात मोठ्या टी२० लीगवर लक्ष ठेवून आहेत. विदेशी संस्था आयपीएलमध्ये संघाला काही अटींसह खरेदी करू शकतात. बीसीसीआय अशा संस्थाना बोली लावण्याची परवानगी देते, जर त्यांनी बोली जिंकली तर त्यांना भारतात एक कंपनी स्थापन करावी लागेल.

जर बोली प्रक्रिया ठरल्याप्रमाणे झाली, तर बीसीसीआयला किमान ५००० कोटी रुपयांचा नफा होईल. कारण अनेक कंपन्या बोली प्रक्रियेत रस दाखवत आहेत. यात अदानी आणि गोएंका ग्रुपचाही समावेश आहे. संघ खरेदी करण्यास ज्यांनी सक्रिय स्वारस्य दाखवले आहे त्यात अदानी ग्रुप, संजीव गोयंका ग्रुप, प्रसिद्ध फार्मा कंपनी टोरेंट आणि एक अग्रणी बँकर यांचा समावेश आहे.

माहितीनुसार, ३००० कोटी किंवा त्याहून अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या कंपन्यांनाच बोली प्रक्रियेत भाग घेण्याची परवानगी असेल. बीसीसीआयला बोलीतून किमान ५००० कोटी रुपयांची अपेक्षा आहे. आयपीएलच्या पुढील हंगामात ७४ सामने होतील.

महत्त्वाच्या बातम्या – 

गोल्डन बॉय इज बॅक! नीरज चोप्रा दीर्घ विश्रांतीनंतर परतला मैदानावर, पाहा फोटो

विराटमुळे रोहितची झाली फजिती? सोशल मीडियावर ‘हिटमॅन’ होतोय ट्रोल

‘आर्चर, स्टोक्स टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी नसणे लाजिरवाणे’, इंग्लंडच्या फलंदाजाचे मोठे वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---