---Advertisement---

श्रेयस अय्यरच्या पुढे दोन श्रेयस? पंजाब किंग्सच्या विजयाचं गुपित काय? भारतीय दिग्गजाने केला खुलासा

On: गुरूवार, मे 29, 2025 2:26 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 (IPL 2025) स्पर्धेमध्ये पहिल्या क्वालिफायर- 1 सामन्यात पंजाब किंग्स (punjab kings vs Royal Challengers Bangalore) संघाचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सोबत आज म्हणजेच (29 मे) रोजी महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या महत्त्वाच्या सामन्याआधी टीम इंडियाचे (team india former cricketer aakash chopda) माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोपडा यांनी त्यांची प्रतिक्रिया शेअर केली आहे. त्यांनी पंजाबच्या फलंदाजीला (punjab kings batting) मजबूत म्हटले आहे. माजी खेळाडूचे म्हणणं आहे, पंजाब संघाची ताकद त्यांची फलंदाजी आहे. त्यांच्या फलंदाजीमध्ये श्रेयस अय्यरच्या (shreyas iyer) पुढे दोन श्रेयस आणि श्रेयस अय्यरच्या मागे दोन श्रेयस अय्यर आहेत. त्यांनी जे दोन अनकैप्ड खेळाडू या बाजूला आणि त्या बाजूला ठेवले होते, ते पूर्ण हंगामात तसेच खेळत होते. पण आता त्यांनी नक्कीच जोश (josh English) इंग्लिशला मध्ये टाकले आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले, या संघाची मुख्य ताकद आहे, ती फलंदाजी आहे. त्यांनी स्पर्धेमध्ये ज्या प्रकारे फलंदाजी केली आहे, ती अतिशय शानदार आहे. पण प्रश्न हा उपस्थित होतो की, आजच्या सामन्यात ते प्रथम फलंदाजी करतील का? मागच्या वेळेस जेव्हा पंजाबने आरसीबीविरुद्ध (PBKS vs RCB) फलंदाजी केली होती. तेव्हा ते जास्त धावा करू शकले नाही. जोश हेजलवूडने (josh Hazlewood) श्रेयस अय्यरला शानदार पद्धतीने बाद केले होते आणि पारीला सहजपणे पुढे जाऊ दिले नाही.

चोपडा पुढे म्हणाले, आज ते पुन्हा तेच करतील का? त्यांनी त्यांची रणनीती बदलली आहे, जेव्हा त्यांनी सवाई मानसिंग स्टेडियममध्ये मुंबई विरुद्ध (PBKS vs Mi) त्यांचा शेवटचा सामना खेळला होता. तेव्हा त्यादरम्यान त्यांनी टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे आज नक्कीच त्यांचा निर्णय बघणे महत्त्वाचे असेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---