वनडे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पहिल्या आठवड्यात अनेक रोमांचक सामने झालेले पाहायला मिळत आहेत. असे असले तरी जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर आहे. 14 ऑक्टोबर रोजी हा सामना अहमदाबाद येथे खेळला जाईल. या सामन्यासाठी आता बीसीसीआयसह भारतीय रेल्वे देखील सज्ज झाली आहे.
विश्वचषकातील सर्वात मोठा सामना मधून भारत आणि पाकिस्तान या सामन्याकडे पाहिले जातेय. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे 14 ऑक्टोबर रोजी हा सामना होईल. हा सामना पाहण्यासाठी महाराष्ट्रातील चाहत्यांना अहमदाबाद येथे जाता यावे याकरिता पश्चिम रेल्वेने दोन विशेष वंदे भारत एक्सप्रेसची सोय केली आहे. महत्त्वाचे म्हणजे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात क्रिकेट सामन्यासाठी अशा प्रकारे विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याची ही पहिली वेळ आहे.
महाराष्ट्र आणि मुंबईतील चाहत्यांना भारत-पाकिस्तान सामना पाहता यावा यासाठी पश्चिम रेल्वेने 13 ऑक्टोबरच्या रात्री आणि 14 ऑक्टोबरच्या पहाटे या गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 13 ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजता पहिली गाडी सोडली जाईल. ही गाडी पहाटे सहा वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल. तर, दुसरी गाडी पहाटे पाच वाजता सोडल्यानंतर दुपारी बारापर्यंत अहमदाबादमध्ये पोहचेल. ही गाडी कोणकोणत्या ठिकाणी थांबेल हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, महत्त्वाच्या स्थानकांवर थांबण्याची शक्यता आहे.
या सामन्यासाठी गुजरात सरकार एकदम तयार असल्याचे दिसून येते. या सामन्यासाठी सुमारे 4,000 होमगार्ड आणि 7,000 हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात केले जातील. या जवानांव्यतिरिक्त, तीन एनएसजी ‘हिट टीम’ आणि एक ड्रोन विरोधी टीम तैनात असतील. बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाच्या नऊ पथकांचाही उपयोग केला जाईल.
(Two Special Vande Bharat Express For India Pakistan Match From Mumbai To Ahmedabad)
इथे सुट्टी नाही! मैदानात उतरताच नवीनला प्रेक्षकांनी घेतले फैलावर, लागले कोहली..कोहलीचे नारे
मोठी बातमी! एशियन गेम्समध्ये भारताला सुवर्ण पदक देण्यावर अफगाणी खेळाडूचा आक्षेप; म्हणाला…