भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरला (Gautam Gambhir) भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी (Head Coach) नियुक्त करण्यात आलं आहे. गंभीर पुढच्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक असणार आहे. गंभीरचा कार्यकाळ आगामी श्रीलंका दौऱ्यापासून सुरु होणार आहे. तत्पूर्वी श्रीलंकेचे दोन खेळाडू म्हणाले की गौतम गंभीर खूप आक्रमक आहे.
अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) स्टार स्पोर्टशी बोलताना म्हणाला की, “गौतम गंभीर नेहमी एक कट्टर प्रतिस्पर्धी राहिला आहे आणि तो खूप आक्रमक सुद्धा आहे. मैदानावर त्याची विकेट घेण्यासाठी त्याच्याशी नेहमी भिडावे लागले आहे. तो मैदानावर एक फलंदाज म्हणून खूप उत्कृष्ट खेळाडू आहे. आम्ही एकमेकांविरोधात खूप क्रिकेट खेळलो आहे. गंभीरला प्रशिक्षक पदासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.”
थिसारा परेरा (Thisara Perera) स्टार स्पोर्टशी गंभीरविषयी बोलताना म्हणाला की, “मी भारत विरुद्ध श्रीलंका 2011चा एकदिवसीय विश्वचषक खेळलो आहे. या सामन्यात मी गंभीरची विकेट घेतली होती. तो माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण आहे. गंभीरनं यंदाच्या आयपीएलमध्ये केकेआरसाठी प्रशिकाच्या रुपात उत्कृष्ट प्रदर्शन केलं. तो एक चांगला प्रशिक्षक आहे, त्यामुळे तो आक्रमक आहे. त्याच्याशिवाय खेळाडूंवर नियंत्रण राखता येत नाही.”
गौतम गंभीरनं (Gautam Gambhir) भारतासाठी 147 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 5,238 धावा ठोकल्या आहेत. यादरम्यानं त्याची सरासरी 39.68 राहिली आहे. एकदिवसीय सामन्यात गंभीरनं 11 शतक आणि 34 अर्धशतक ठोकले आहेत. त्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 150 राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान नताशाने सोडले हार्दिक पांड्याचे घर? मुलासोबत कायमची माहेरी परतणार?
निवृत्तीनंतर जेम्स अँडरसनला मिळाली मोठी जबाबदारी, इंग्लंडसाठी या भूमिकेत दिसणार
गंभीरचं चाललंय तरी काय, नव्या प्रशिक्षकाने पहिल्याच बैठकीत असं काय केलं ज्यामुळे मिटिंग पुढे ढकलली…