---Advertisement---

IPL 2024 । ऋतुराजच्या नेतृत्वात सीएसकेचा सलग दुसरा विजय, गुजरातवर 63 धावांनी मात

---Advertisement---

गुजरात टायटन्सने इंडियन प्रीमियर लीग 2024 हंगामातील आपला दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळला. मंगळवारी (26 मार्च) झालेल्या या सामन्यात सीएसकेने 63 धावांनी विजय मिळवला. 207 धावांचे लक्ष्य गाठम्यासाठी मैदानात आलेला गुजरात संघ, 8 विकेट्सच्या नुकसानावर 143 धावांपर्यंतच मजल मारू शकला.

गुजरातसाठी सलामीवीर वृद्धिमान साहा याने 17 चेंडूत 21 धावांची खेळी केली. शुबमन गिल याने 5 चेंडूत 8 धावा, तर साई सुदर्शन याने 31 चेंडूत 37 धावांची सर्वोत्तम खेळी केली. विजय शंकर 12, डेव्हिड मिलर 21, तर अझमतुल्लाह ओमरझाई याने 11 धावांची खेळी केली. राशिद खान याने अवघी एक धाव करून विकेट गमावली. राहुल तेवतिया 6 धावांवर बाद झाला. उमेश यादव नाबाद 10, तर स्पेन्सर जॉन्सर याने 5 धावांवर विकेट गमावली.

दीपक चाहर, मुस्तफिझूर रहमान आणि तुशार देशपांडे यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स गेतल्या. डॅरिल मिचेल आणि मथिशा पथिराना यांनीही प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने 6 विकेट्सच्या नुकसानावर 206 धावा केल्या होत्या. ऋतुराज गायकवाड आणि रचिन रविंद्र यांनी प्रत्येकी 46-46 धावांची खेळी करत सीएसकेला चांगली सुरुवात मिळवून दिली. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाज करतणाऱ्या शिवम दुबे यानेही 23 चेंडूत 51 धावा केल्या. डॅरिल मिचेल याने नाबाद 24, तर समीर रिझवी याने 6 चेंडूत 14 धावांचे योगदान दिले. रविंद्र जडेजा याने 3 चेंडूत 7 धावांची खेळी केली.

राशिद खान याने 42 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतल्या होत्या. तर साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट गुजरातसाठी घेतली.
(Two wins in a row for the defending champions Chennai Super Kings in IPL 2024!)

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
चेन्नई सुपर किंग्ज : रुतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान.

गुजरात टायटन्स : रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, आर साई किशोर, उमेश यादव, मोहित शर्मा, स्पेन्सर जॉन्सन.

महत्वाच्या बातम्या – 
वय फक्त आकडा! 42वर्षीय धोनीची जबरदस्त डाईव्ह, झेल पकडल्यावर सहकारीही आश्चर्यचकित
सलग दुसऱ्या विजयासाठी सीएसके आणि गुजरात आमने सामने, नाणेफेक जिंकून गिलने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---