IPLक्रिकेटटॉप बातम्या

वय फक्त आकडा! 42वर्षीय धोनीची जबरदस्त डाईव्ह, झेल पकडल्यावर सहकारीही आश्चर्यचकित

एमएस धोनी यावर्षी कदाचित आपला शेवटचा आयपीएल हंगाम खेळत आहे. इंडिनय प्रीमियर लीग 2024 हंगामाला सुरुवात होण्याच्या काही तास आधी धोनीने सीएसकेचे कर्णधारपद सोडले. ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्जचा नवा कर्णधार आहे. मंगळवारी (26 मार्च) ऋतुराजच्या नेतृत्वातील सीएसके आणि गुजरात टायटन्स यांच्यात आमना सामना आहे. धोनीने या सामन्यात यष्टीपाठी एक असा झेल पकडला ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

एमएस धोनी (MS Dhoni) याच्या मार्गदर्शनात सीएसकेने आतापर्यंत 5 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. पण आयपीएल 2024 पूर्वी त्याने सीएसकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याच्या खांद्यावर सोपवली. ऋतुराजच्या नेतृत्वात सीएसकेने हंगामातील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध जिंकला. मंगळवारी (26 मार्च) हंगामातील दुसरा सामना जिंकण्यासाठी संघ मैदानात उतरला होता. या सामन्यात धोनीचे मार्गदर्शन सीएसकेला महत्वाचे ठरले. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत देखील 42 वर्षीय एमएस धोनी कुठेच कमी पडताना दिसला नाही.

गुजरात टायटन्सच्या डावातील आठव्या षटकात डॅरील मिचेल गोलंदाजी करत होता. षटकातील तिसऱ्या चेंडूवर विजय शंकर (Vijay Shankar) याने यष्टीरक्षक एमएस धोनीच्या हातात विकेट गमावली. धोनीने उजव्या बाजूला डाईव्ह मारत दोन्ही हातात हा झेल पकडला. धोनीने दाखवलेली चपळाई पाहून संघातील सहकारी खेळाडूही खूश झाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
चेन्नई सुपर किंग्ज : रुतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान.

गुजरात टायटन्स : रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, आर साई किशोर, उमेश यादव, मोहित शर्मा, स्पेन्सर जॉन्सन.

महत्वाच्या बातम्या – 
बॅटिंग घेऊ की बॉलिंग? नाणेफेक जिंकल्यानंतर शुबमन गिल कंफ्यूज, व्हिडिओ व्हायरल
रचिन-ऋतुराजची जबरदस्त सुरुवात, दुबेच्या अर्धशतकामुळे सीएसकेची धावसंख्या 200 पार

Related Articles