---Advertisement---

दोन वर्षांचा चिमुकला लाईव्ह सामन्यात घुसला अन् घडलं असं काही; व्हिडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ

On: गुरूवार, ऑगस्ट 12, 2021 5:56 PM
---Advertisement---

कोणत्याही खेळाला त्या खेळाचे प्रेक्षक हे नेहमीच मनोरंजक बनवत असतात. अनेकदा चाहते सामना चालू असताना मैदानात दाखल होतात आणि त्यानंतर संपूर्ण मैदानात मजेदार घटनांचा क्रम सुरू होतो. क्रिकेट आणि फुटबॉलच्या मैदानात या घटना सातत्याने होत असतात. अमेरिकेतील प्रसिद्ध फुटबॉल लीगमध्ये घडलेल्या अशाच एका घटनेने सध्या सोशलमीडिया काबीज केली आहे. एका लहान मुलाचा व त्याच्या आईचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

अशी घडली घटना
सध्या अमेरिकेमध्ये तेथील प्रमुख फुटबॉल लीग असलेली मेजर लीग सॉकर ही स्पर्धा सुरू आहे. रविवारी सायंकाळी या स्पर्धेत सिनसिनाटी विरुद्ध ओरलँडो एफसी या संघांमध्ये सिनसिनाटी येथील टीएलक्यू स्टेडियमवर सामना खेळला जात होता. अटीतटीच्या चाललेल्या या सामन्यात अचानकपणे एक गमतीदार घटना घडली.

सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये सिनसिनाटी संघाचे खेळाडू आक्रमण करत असतानाच, दोन वर्षाचा लहान मुलगा अचानकपणे धावत मैदानात आला. त्यापाठोपाठ त्याची आई देखील त्या मुलाला पकडण्यासाठी मैदानात आली. मात्र, आपल्या मुलाला उचलताना ती आईदेखील घसरून खाली पडली. परंतु, अखेरीस त्या आईने मुलाला उचलून घेत पुन्हा एकदा आपल्या जागेवर आणून बसवले. हा मुलगा आणि त्याची आई रशियन असल्याचे सांगण्यात येतेय. त्यांचा हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर सगळीकडे पाहायला मिळत आहे.

असा राहिला सामन्याचा निकाल
आपल्या घरच्या मैदानावर खेळत असलेल्या सिनसिनाटी संघाला या सामन्यात बरोबरीमध्ये समाधान मानावे लागले. सिनसिनाटी संघासाठी पहिल्या हाफच्या अखेरीस ४२ व्या मिनिटाला ब्रेनर याने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र, ओरलँडो एफसीसाठी नानी याने ५७ व्या मिनिटाला गोल झळकावून सामना बरोबरीत आणला. उर्वरित वेळात एकही गोल न झाल्याने अखेर सामना १-१ अशा बरोबरीत संपला. ओरलँडो एफसी गुणतालिकेत दुसऱ्या तर, सिनसिनाटी तेराव्या क्रमांकावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वेबसाइटवर बांगलादेशच्या जल्लोषाचा व्हिडिओ पाहून पेटला वाद, कोचचाही चढला पारा

विराट कोहलीच्या नेतृत्वात चुका शोधून काढणाऱ्यांना जड्डूचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाला…

विगलीकरणात सूर्या अन् पृथ्वीमध्ये घुसला ‘ऍक्टिंगचा किडा’, अभिनयात सलमान-आमिरलाही दिली टक्कर!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---