---Advertisement---

टीम इंडियाची सेमीफायनल! कधी आणि कुठे रंगणार लढत? पाकिस्तानचा संघही त्याच दिवशी मैदानात उतरणार

On: गुरूवार, डिसेंबर 18, 2025 8:42 PM
---Advertisement---

एसीसी (ACC) पुरुष अंडर-19 आशिया चषक 2025 चे दोन्ही उपांत्य फेरीचे (Semi-finals) सामने 19 डिसेंबर रोजी दुबईत खेळवले जाणार आहेत. पहिला सामना भारत अंडर-19 विरुद्ध श्रीलंका अंडर-19 संघात खेळला जाणार आहे तर, दुसरा उपांत्य सामना बांगलादेश अंडर-१९ विरुद्ध पाकिस्तान अंडर-१९ मध्ये होणार आहे. या चारही संघांनी आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे, त्यामुळे चाहत्यांमध्ये या सामन्यांबाबत मोठी उत्सुकता आहे.

भारत आणि श्रीलंका (IND vs SRI) यांच्यातील हा महत्त्वाचा सामना चाहत्यांना खालील प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स (Sony Sports) चॅनेलवर थेट प्रक्षेपण होईल. मोबाईल/डिजिटलवर सोनी लिव (Sony LIV) या ॲपवर सामन्याचा आनंद घेता येईल.
दुसरा उपांत्य सामनादेखील याच चॅनेल आणि ॲपवर प्रसारित केला जाईल.

या स्पर्धेत भारतीय संघाच्या कामगिरीवर चाहत्यांच्या विशेष नजरा आहेत. विशेषतः वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi & Ayush Mhatre) आणि आयुष म्हात्रे यांच्या फॉर्मची चर्चा रंगली आहे. तसेच, अभिज्ञान कुंडूने (Abhidyaan kundu) द्विशतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, उपांत्य फेरीत तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---