वेस्टइंडीज येथे सुरु असलेली आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ (ICC under 19 world cup 2022) स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहचली आहे. या विश्वचषकात रोमांचक सामने पाहायला मिळाले. नुकतेच या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील सामने समाप्त झाले असून मंगळवार पासुन उपांत्य फेरीला सुरुवात झाली आहे. मंगळवारी (०१ फेब्रुवारी) पहिल्या उपांत्य फेरीत इंग्लंड आणि अफगाणिस्तान (england vs afghanistan) आमने-ंसामने येणार आहेत तर बुधवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया (india vs australia) संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत.
उपांत्यपुर्व फेरीचा ३० जानेवारीला आणखी एक रोमांचक खेळला गेला. नाॅर्थ साऊंडमध्ये खेळल्या गेलेल्या श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेला ६५ धावांनी पराभूत केले. सामना गमावून सुद्धा आफ्रिकेने चाहत्यांचे मन जिंकले आहे.
सामन्यादरम्यान ऍँडिले सिमिलानेने दुसऱ्या स्लीपमध्ये सकुना लियानेझचा सर्वोत्तम झेल पकडला. ही घटना श्रीलंकेच्या डावाच्या नवव्या षटकात घडली. त्यावेळी मॅथ्यू बोस्ट गोलंदाजी करत होता. दुसऱ्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक सिमिलानेला या षटकातील तिसरा चेंडू पहिल्यांदा नीट झेलता आला नाही. पण त्याने त्वरित चेंडू खाली पडायच्या आत तो झेल घेतला. हवेत झेप घेत सिमिलाने हा चेंडू पकडला.
पहिल्यांदा त्याच्या हातातून चेंडू निसटला होता पण पुन्हा त्याने हवेत चेंडू पकडला. या झेलसाठी सिमिलानेचे खूप कौतुक केले जात आहे. आयसीसीने इंस्टाग्राम आकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
https://www.instagram.com/reel/CZW3qsmlVbi/?utm_source=ig_web_copy_link
या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार ड्युनिथ वेलालेझने उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याने १३० चेंडूत ११३ धावा करत श्रीलंकेला २३२ धावा करण्यास मदत केली. वेलालेझने नऊ चौकार आणि चार षटकार मारले. तसेच सोमरत्नेने ७० चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकार मारत नाबाद ५७ धावांची खेळी केली. श्रीलंकेने ठेवलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघ ३७.३ षटकांत १६७ धावांवरच सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून गेरहार्ड मारीने ४३ चेंडूंत सात चौकारांच्या मारत ४४ धावा केल्या. याशिवाय एकाही फलंदाजाला विशेष काही कामगीरी करता आली नाही. त्यामुळे संघाला पराभवाला सामोर जावे लागले.
दरम्यान भारतीय संघाची सुपर लीग उपांत्य फेरीतील लढत ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध २ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यात रंगणार आहे. या दोन्ही संघांपैकी जो संघ विजयी होणार, तो आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. अंतिम सामन्यात इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांमधील विजेत्या संघासोबत ऑस्ट्रेलिया किंवा भारत खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनी-कोहलीवर नाही आली वेळ, पण रोहितला ‘या’ बड्या आव्हानाला जावं लागणार सामोरे