प्रो कबड्डी (Pro Kabaddi) लीगच्या नवव्या हंगामात शनिवारी (29 ऑक्टोबर) तीन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात दबंग दिल्लीला 47-43 असे पराभूत करत बेंगलोर बुल्सने गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले. दिवसातील दुसऱ्या सामन्यात गुजरात जायंट्सने तेलगू टायटन्सला 30-19 ने पराभूत केले. तर, बंगाल वॉरियर्स आणि यु मुंबा यांच्यातील सामन्यात मुंबईने सलग दुसरा विजय मिळवत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली.
Nothing better than a last-gasp win 🤩#Bharat helps the Bulls 🔝 the points table in style 🫡#vivoProKabaddi #FantasticPanga #BLRvDEL pic.twitter.com/GjFZ8p3vjS
— ProKabaddi (@ProKabaddi) October 29, 2022
गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या दबंग दिल्लीने सलग दोन पराभवानंतर विजयाच्या इराद्याने मैदानात पाऊल ठेवले. नवीन कुमारने सुरुवातीला सुपर रेड करत चांगली सुरुवात केली. मात्र, त्यानंतर बेंगलोरसाठी भरत हुडाने एकाकी लढत देत बेंगलोरला आघाडीवर नेले. एकाच हाफमध्ये दोन वेळा दिल्लीला ऑल आउट करत त्यांनी पहिल्या हाफच्या अखेरीस 10 गुणांची आघाडी मिळवली. मात्र, दिल्लीने दुसऱ्या हाफमध्ये जबरदस्त कमबॅक केला. त्यांनी ती पिछाडी भरून काढत बहुमूल्य आघाडी देखील मिळवली. मात्र, अखेरच्या मिनिटात एका गुणांनी आघाडीवर असलेल्या दिल्लीला अतातायीपणा नडला. भरत हुडाने त्या अखेरच्या काही सेकंदात पाच गुणांची रेड करत बेंगलोरचा विजय निश्चित केला. भरतने एकट्याने 20 गुणांची नोंद केली.
The 𝗚𝗶𝗮𝗻𝘁𝘀 hand the 𝗧𝗶𝘁𝗮𝗻𝘀 a 5️⃣th straight defeat 😮
How impressive was this 𝗚𝗶𝗴𝗮𝗻𝘁𝗶𝗰 win?#vivoProKabaddi #FantasticPanga #TTvGG pic.twitter.com/AQcpetNxVd
— ProKabaddi (@ProKabaddi) October 29, 2022
दिवसातील दुसरा सामना गुणतालिकेत तळाशी असलेल्या गुजरात जायंट्स व तेलुगू टायटन्स यांच्यात झाला. विजयासाठी आसुसलेल्या या दोन्ही संघांनी बचावात्मक खेळावर भर दिला. पहिल्या हाफमध्ये बरोबरीच्या झालेल्या या सामन्यात गुजरातने नंतर आघाडी घेतली. पूर्ण वेळेनंतर त्यांनी 30-19 असा विजय संपादन केला.
दिवसातील अखेरचा सामना विजय रथावर आरूढ असलेल्या यु मुंबा आणि बंगाल वारियर्स यांच्या दरम्यान खेळला गेला. संपूर्ण हंगामात आपल्या कामगिरीने सर्वांना चकित करणाऱ्या मुंबईने या सामन्यातही तसाच खेळ दाखवला. अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या बंगाल वॉरियर्सला त्यांनी जास्त आक्रमणाची संधी न देता डिफेन्सच्या जोरावर सामना 36-25 असा विजय मिळवला. मुंबईसाठी कर्णधार सुरेंदर, मोहित व रिंकू या तिघांनी हाय फाईव पूर्ण केले.