आजकाल कोणताही खेळ फक्त मैदानावर खेळला जात नाही. खेळाचे चाहते आपल्या संघाच्या कामगिरीवर अगदी सोशल माध्यमांवरसुद्धा भांडत असतात. त्यामुळे कुणाच्या पेजला किती लाइक्स ते कुणाच्या ट्विटर अकाउंटला किती फोल्लोवेर्स यापर्यंत चाहते माहिती ठेवतात.
त्यामुळे या सोशल माध्यमांवरही सर्वच संघात जोरदार चुरस असते. फेसबुक, ट्विटर नंतर सध्या सर्वात लोकप्रिय असणाऱ्या इंस्टाग्रामवरही आजकाल बहुतेक संघ आपल्या अधिकृत अकाउंटसह असतात. रोज होणाऱ्या घडामोडी, मोठ्या गोष्टी, घोषणा यांची छायाचित्र इंस्टाग्राम या तरुणांच्या लाडक्या सोशल मीडिया वेबसाइटवर टाकली जातात.
मग त्याला आपल्या देशातील लाडक्या प्रो कबड्डीमधील संघ तरी कसे अपवाद असणार. ट्विटर आंणि फेसबुक प्रमाणेच इंस्टाग्रामवरही मोठ्या प्रमाणावर प्रो कबड्डी संघाना पाठिंबा मिळतो. देशात कोणत्याही लीगचा संघ असेल तरी मुंबईच्या संघाची बात काही औरच असते. या संघाला कायम एक स्पेसिअल संघ म्हणून पहिले जाते.
मग त्यात आपल्या यु मुंबाचा संघ तरी कसा मागे असेल. इंस्टाग्रामवर प्रो कबड्डीमधील सर्व संघ आहेत. परंतु राज्य आहे ते यु मुंबाच. दुसऱ्या क्रमांकावरील जयपूर पिंक पँथर्स संघाला तब्बल १४ हजार फोल्लोवेर्सने मागे टाकत यु मुंबा इंस्टाग्रामवर राज्य करते. सर्वात जास्त अर्थात ३८, १०० फोल्लोवेर्स यु मुंबा संघाला इंस्टाग्रामवर आहे.
ऐकून चकित व्हाल परंतु यु मुंबा ज्या लीगमधील संघ आहे त्या प्रो कबड्डीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा एवढे फॉलोवर्स नाहीत. प्रो कबड्डी अधिकृत अकाउंटला आहेत २४, ००० फोल्लोवेर्स.
इंस्टाग्रामवरील ही आहे मनोरंजक आकडेवारी…
क्रमवारी (इंस्टाग्राम फॉलोवर्स):-
१. यु मुंबा – ३८,१००
२. जयपूर पिंक पँथर्स – २४,२००
३.बंगळुरू बुल्स – २२,०००
४.पाटणा पायरेट्स – २०,२००
५.पुणेरी पलटण – २०,०००
६. तेलगू टायटन्स – १८,१००
७.दबंग दिल्ली – ११,६००
८. बंगाल वोरीयर्स – ९,०००
९. हरियाणा – १,९९३
१०. तामिल थलइवा – ९०३
११. गुजरात फॉरचूनजायन्ट – ८
१२. उत्तर प्रदेश – अकॉउंट नाही.