---Advertisement---

U19 ICC WC: पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीची बॅट फेल, पावसामुळे भारत वि. अमेरिका सामना थांबला

On: गुरूवार, जानेवारी 15, 2026 6:24 PM
---Advertisement---

गुरूवारपासून (15 जानेवारी) 19 वर्षाखालील पुरूषांच्या वनडे विश्वचषकाला सुरूवात झाली. या स्पर्धेतील पहिला सामना भारत विरुद्ध अमेरिका यांच्यात बुलवायो येथे खेळला जात आहे. स्पर्धेच्या सुरूवातीलाच क्रिकेट रसिकांमध्ये भारताचा युवा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्या फलंदाजीची क्रेज निर्माण झाली. आता त्याच्या तडाखेबाज बॅटींगची चाहत्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे, कारण तो पहिल्याच सामन्यात एकेरी धावा करत बाद झाला.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत अमेरिकेला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. भारतीय गोलंदाजांनीही सामन्याची उत्तम सुरूवात केली. सर्व गोलंदाजांनी अधिक धावा न देता अमेरिकेला 35.2 षटकात सर्वबाद 107 धावसंख्येवर रोखले. यामध्ये हेनिल पटेल याने सर्वाधिक विकेट्स घेतले. त्याने 7 षटकात 16 धावा देत पाच विकेट्स घेतल्या. भारताचे गोलंदाजीबरोबर क्षेत्ररक्षणही चांगले झाले.

या सामन्यात 14 वर्षीय वैभवनेही एक विकेट घेतली. त्याने नीतिश सुदीनी या खतरनाक वाटणाऱ्या फलंदाजाला बाद केले. सुदीनीने अमेरिकेसाठी सर्वाधिक अशा 36 धावा केल्या. त्याने त्याच्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर ही कामगिरी केली. गोलंदाजीत कमाल करणारा वैभव फलंदाजीत मात्र अपयशी ठरला.

भारताकडून लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी वैभवसोबत कर्णधार आयुष म्हात्रे खेळपट्टीवर आला. वैभवचा सध्याचा फॉर्म आणि धावसंख्या कमी असल्याने विजय सोपा वाटत होता, मात्र घडले भलतेच. तो 4 चेंडूत 2 धावा करत बाद झाला. त्याला रित्विक अप्पीडीने त्रिफळाचीत केले.

पावसामुळे सामना सध्या थांबवला गेला असून आयुष 17 चेंडूत तीन चौकाराच्या मदतीने 15 धावांवर आणि वेदांत त्रिवेदी 2 धावांवर खेळत आहे. भारताची स्थिती 4 षटकांत एक बाद 21 धावा अशी आहे.

या स्पर्धेत भारताचा दुसरा सामना 17 जानेवारीला बांगलादेश विरुद्ध आहे. तसेच तिसरा सामना 24 जानेवारीला न्यूझीलंडविरुद्ध आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---