आयसीसी 19 वर्षांखालील वनडे विश्वचषक सध्या खेळला जात आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात स्पर्धेतील 25 वा सामना मंगळवारी (30 जानेवारी) खेळला गेला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात भारताने तब्बल 214 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 295 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघ अवघ्या 81 धावांवर सर्वबाद झाला. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये भारताने चमकदार कामगिरी केली आणि विश्वचषकातील आपला लगल चौथा विजय मिळवला.
न्यूझीलंडला या सामन्यात विजयासाठी 296 धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघ मात्र 28.1 षटकात अवघ्या 81 धावा करून सर्वबाद झाला. संघातील एकही फलंदाज 20 धावांपेक्षा मोठी खेळी करू शकला नाही. तीन फलंदाजांनी शुन्यावर, तर तीन फलंदाजांनी एक आकडी धावसंख्येवर विकेट्स गमावल्या. भारतासाठी सौम्य पांडे (Saumya Pandey) पुन्हा एकदा चेंडूने मॅच विनर ठरला. त्याने आपल्या फिरकीच्या जाळ्यात मंगळवारी न्यूझीलंडचे एकू चार फलंदाज अडकवले. यासाठी त्याने 10 षटके गोलंदाजी केली आणि 19 धावाही खर्च केल्या. तत्पूर्वी फलंदाजी विभागातून भारतासाठी सर्वोत्तम प्रदर्शन मुशीर खान (Musheer Khan) याने केले. 19वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाने मिलवलेला हा सलग चौथा विजय ठरला.
Another stellar bowling performance & another win for the #BoysInBlue in the #U19WorldCup! ????????#TeamIndia register a 214-run win over New Zealand U19 ????????
Scorecard ▶️ https://t.co/UdOH802Y4s#INDvNZ pic.twitter.com/tFfu3lVqSg
— BCCI (@BCCI) January 30, 2024
तत्पूर्वी नाणेफेक गमावल्यानंतर भारताला या सामन्यात प्रथम फलंदाजी करावी लागली. सलामीवीर आदर्श सिंग याने याने 58 चेंडूत 52 धावांची खेळी केली. तर मुशीर खान याने 126 चेंडूत 131 धावा केल्या. मुशीरसाठी विश्वचषक हंगामातील हे दुसरे शतक होते. कर्णधार उदय सहारन याने 34 धावांचे योगदान दिले. पण त्याव्यतिरिक्त संघातील एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नव्हता. 50 षटकांमध्ये 8 विकेट्सच्या नुकसानावर भारतीय संघ 394 धावांपर्यंत पोहोचला.
– India beat Bangladesh by 84 runs.
– India beat Ireland by 201 runs.
– India beat USA by 201 runs.
– India beat New Zealand by 214 runs.India continues their dominance by thrashing Kiwis in Super 6 ???????? The dream run continues in U-19 World Cup 2024. pic.twitter.com/K0kPoCxpit
— Johns. (@CricCrazyJohns) January 30, 2024
मेसन क्लार्क याने न्यूझीलंडसाठी 8 षटकात 62 धावा खर्च करून सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. रायन त्सोर्गस, इवाल्ड श्रुडर, झॅक कमिंग आणि ऑलिव्हर तेवतिया यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. भारतासाठी गोलंदाजी आक्रमणातील राज लिंबानी आणि मुशीर खान यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. नमन तिवारी आणि अर्शीन कुलकर्णी यांनी प्रत्येकी एक-एक विकेट या सामन्यात घेतली. (U19 World Cup 2024 । India Won the Match by 214 Runs against New Zealand)
महत्वाच्या बातम्या –
अशा वेदना कोणालाच्या नशीबी येऊ नये! मुलाच्या आठवणीत शिखर धवन पुन्हा इमोशनल, पाहा काय म्हणाला
मोठी बातमी! जय शहा ACC अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत, डोक्यात आहे मोठा प्लॅन






