रविवारी भारत आणि ऑस्ट्रलियामध्ये 19 वर्षाखालील वर्ल्डकपच्या फायनलमध्ये विजेतेपदासाठी भिडणार आहेत. तर भारत आपले सहावे विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. याबरोबरच यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज नमन तिवारीने सर्वांनाच प्रभावित देखील केलं आहे.
नमन तिवारी हा लखनौचा असून त्याने पीटीआयला मुलाखत दिली आहे. त्यावेळी त्याने फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध तो जसप्रीत बुमराहने दिलेल्या टिप्सचा वापर करणार असल्याचे म्हंटले आहे. याबरोबरच, जसप्रीत बुमराहने एनसीएमध्ये असताना नमनला खूप टिप्स दिल्या होत्या. त्याचा फायदा आता त्याला यंदाच्या वर्ल्डकपमध्ये खेळताना होत आहे.
घ्या जाणून नमन कशासाठी आहे प्रसिद्ध
आतापर्यत 19 वर्षाखालील वर्ल्डकपच्या सामन्यांमध्ये नमन तिवारीने 5 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच स्पर्धेत त्याचा घातक यॉर्कर चांगलाच चर्चेत देखील आला होता. तर, नमनने आयर्लंडविरूद्धच्या सामन्यात चार विकेट्स घेतल्या होत्या. नमन यॉर्करसोबतच आपल्या वेगासाठी देखील प्रसिद्ध आहे. त्याचे प्रेरणास्थान हे जसप्रीत बुमराह हा आहे.
घ्या जाणून नमनला कोणी शिकवला यॉर्कर
नमन तिवारीने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हंटले आहे की, मी जसप्रीत बुमराहचे बरेच व्हिडिओ पाहतो. मी त्याला एनसीएमध्ये अनेकवेळा भेटलो आहे. त्यावेळी त्याने मला नेहमी गोलंदाजीबाबत अनेक महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत. त्यामुळे बुमराहने दिलेल्या टिप्स स्पर्धेत मला खूप उपयोगाला आल्या आहेत. याबरोबरच तिवारीने सांगितले की बुमराहने त्याला यॉर्कर कसा टाकायचा याच्या टिप्स दिल्या असून मी त्याच्यावर भरपूर काम देखील केलं आहे.
दरम्यान, नमन तिवारीने सांगितले की त्याने फलंदाज म्हणून क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली होती. मात्र फलंदाजी करण्याची फारशी संधी मला मिळत नव्हती. त्यामुळे लखनौच्या अकॅडमीत मी गोलंदाजीचा सराव करण्यास सुरूवात केली होती. तसेच, नमनने सांगितले की त्याला जगातील सर्वात वेगवान चेंडू टाकायचा आहे. त्यासाठी मी खूप मेहनत करत आहे. मात्र सध्या च्याचे लक्ष हे ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या फायनलवर आहे.
महत्वाच्या बातम्या –
L&T मुंबई ओपन डब्लूटीए स्पर्धेच्या एकेरीत भारताच्या ऋतुजा भोसलेचे आव्हान संपुष्टात
Tom Moody : टॉम मूडी यांचा दावा; म्हणाले, T20 विश्वचषकासाठी आयपीएलची कामगिरी महत्त्वांची