बल्गेरियातील सोफिया येथे सुरू असलेल्या २० वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत रविवारी (२१ ऑगस्ट) भारताच्या खात्यात आणखी दोन पदकांची भर पडली. रोहित दहिया व सुमित यांनी कांस्य पदके भारताच्या पारड्यात टाकली. सोबतच भारताच्या महिला संघाने देखील अविश्वसनीय कामगिरी करत दुसरे स्थान पटकावले.
रविवारी स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारतासाठी आशियाई कांस्य पदक विजेता रोहित दहिया यांनी ग्रीको रोमन प्रकारातील ८२ किलो वजनी गटात सहभाग नोंदवला. त्याला अंतिम फेरीत जाण्यात यश आले नाही. मात्र, कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात युक्रेनच्या रूसलानचा ८-७ असा नजीकच्या सामन्यात पराभव करत भारताचे पदक निश्चित केले.
तत्पूर्वी, सुमित याने ग्रीको रोमन कुस्तीतील ६० किलो वजनी गटात टर्कीच्या इलबार्सला ६-३ असे पराभूत करून भारताला पहिले ग्रीक रोमन पदक मिळवून दिलेले.
भारतीय कुस्तीपटूंसाठी ही स्पर्धा लक्षात राहण्यासारखी ठरली. फ्री स्टाइल कुस्तीत भारतीय कुस्तीपटूंनी सहा कांस्य व एक रौप्य पदक पटकावत इराण व अमेरिकेनंतर गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले होते. भारतीय महिलांनी तर यापेक्षा सरस कामगिरी करत, जपाननंतर दुसरे स्थान पटकावण्याची कामगिरी केली होती. संपूर्ण स्पर्धेचा विचार केला गेल्यास भारताने १ सुवर्ण, ४ रौप्य व ११ कांस्य पदके जिंकून स्वप्नवत कामगिरी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
‘एशिया क्रिकेटचे माहेरघर, शारजाह क्रिकेट स्टेडियम’, टीम इंंडियाशी आहे खास कनेक्शन
तिसऱ्या वनडेत पुण्याचा ऋतुराज घेणार गब्बरची जागा!, वाचा काय आहे कारण
विराट-धोनी नाही, तर ‘या’ दोघांमुळे चहल आज भारताचा नंबर १ स्पिनर, स्वतःच दिले स्पष्टीकरण