मुंबई । आयसीसीने ऑस्ट्रेलियामध्ये होणारी टी 20 विश्वचषक स्पर्धा आणि आशिया चषक स्पर्धा रद्द झाल्यानंतर बीसीसीआयचा आयपीएल नियोजनाचा मार्ग मोकळा झाला. बीसीसीआयने याची अधिकृत घोषणा केली नसली तरी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी यंदाची आयपीएल स्पर्धा यूएई येथे भरवण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. ही स्पर्धा या देशात भरवण्यासाठी सरकारकडून परवानगी घेत आहेत.
यंदाची आयपीएल स्पर्धा 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या दरम्यान होणार आहे. आयपीएलचे वेळापत्रक मात्र अद्याप तयार झाले नाही. पण बीसीसीआयकडे हे वेळापत्रक तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. युएई क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. आयपीएलचे आयोजन करण्यासाठी बीसीसीआयने अद्याप युएईशी अधिकृतपणे काही बोललेले नसले तरी युएई क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेची तयारी सुरू केली आहे.
युएई बोर्डाचे सरचिटणीस मुबाशीर उस्मानी स्पोर्ट्सस्टारशी बोलताना म्हणाले की, “एप्रिलमध्ये आम्ही बीसीसीआयला पत्र लिहिले होते की, आयपीएल आयोजीत करण्यात आम्ही तयार आहोत. आम्ही ब्रजेश पटेल यांचे विधान प्रसारमाध्यमात ऐकले आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो.”
ते म्हणाले, “आम्ही आयपीएलचे आयोजन करण्यास पूर्णपणे तयार आहोत. तथापि, आम्ही अद्याप बीसीसीआयकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा करीत आहोत जेणेकरुन आम्ही पुढील कामात व्यस्त राहू. त्याचबरोबर यूएईमध्ये होणार्या या आयपीएलमध्ये चाहत्यांनाही आमंत्रित केले जाईल अशी अपेक्षा आहे.”
“आम्ही आमच्या सरकारला काही योजना प्रस्तावित करू आणि या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी कोणत्या प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक आहे याची मंजूरी देखील घेऊ,” असे उस्मानी म्हणाले.
प्रेक्षकांना स्टेडियमवर आमंत्रित करण्याविषयी बोलताना उस्मानी म्हणाले, ”आशियाई आणि अमिराती लोकांनी युएईमध्ये येऊन आयपीएल पहावी, अशी आमची इच्छा आहे. ते इतकी मोठी लीग पाहण्यास उत्सुक आहेत. चाहत्यांना स्टेडियमवर आणण्यासाठी थोडी सवलत देण्यास आम्ही सरकारला सांगू.”
विशेष म्हणजे, दुबईमधील कर्फ्यू हटविण्यात आला आहे आणि अबूधाबी आणि शारजहामध्ये कोरोना प्रोटोकॉल आणि निर्बंधांचे पालन केले जात असले तरी पर्यटकांनाही तेथे जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. दुबईमध्येही रेस्टॉरंट्स सुरू झाले आहेत. 30 ते 50 टक्के लोकांना सामाजिक अंतर आणि सुरक्षिततेसह फिरण्याची परवानगी आहे. अशा परिस्थितीत यूएईमध्ये होणार्या आयपीएलमधील चाहत्यांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी मिळण्याची अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–मुंबई इंडियन्स आहे आयपीएल विजेतेपदाचा दुसरा प्रबळ दावेदार, तर या संघाला आहे सर्वाधिक संधी
–१९८३ विश्वविजेत्या भारतापेक्षा पाकिस्तानच्या खेळाडूंना मिळाले होते २६पट जास्त पैसे, रमीज राजाने शेअर केला फोटो
–आयर्लंडच्या क्रिकेटरला होतोय स्टेडियमधील खुर्च्यांचा त्रास, चेंडू शोधायला जातोय खूप वेळ
–आयपीएल २०२०साठी हा संघ सर्वात आधी जाणार दुबईला, काहाही करुन जिंकायची आहे आयपीएल ट्रॉफी
वाचनीय लेख-
–क्रिकेट वेडापायी वसईचा पाटील खेळला युएईकडून; कर्णधार होऊन केले भारताविरुद्धच दोन हात, वाचा संपुर्ण स्टोरी
–झिम्बाब्वेला क्रिकेटमध्ये मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या ऍलिस्टर कॅम्पबेलची कारकिर्द एक अध्याय ठरली
–टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ४- शैलीच्या विपरीत खेळत डिविलीयर्सने २२० चेंडूत ३३ धावा केल्या, परंतू क्रिकेटरसिकांच्या हृदयात..