---Advertisement---

अरे भावा खाली तर बघ! प्रसिद्ध फलंदाजाने खाली न बघता टाकले पाऊल अन् पडला तोंडघशी, व्हिडिओ

On: रविवार, ऑक्टोबर 16, 2022 7:53 PM
Aayan-Afzal-Khan-Video
---Advertisement---

बहुप्रतिक्षित 8व्या टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेला रविवारपासून (दि. 16 ऑक्टोबर) सुरुवात झाली. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दोन सामने पार पडले. यातील पहिला सामना नामीबिया आणि श्रीलंका संघात पार पडला. यात नामीबियाने श्रीलंकेला 55 धावांनी धूळ चारली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्स संघाने यूएईला 3 विकेट्सने पराभूत केले. या दोन्ही सामन्यात अनेक मजेशीर क्षण पाहायला मिळाले. त्यापैकीच एक दुसऱ्या सामन्यात घडला. यूएईचा फलंदाज अयान अफजल खान हा सीमारेषेजवळ तोंडघशी पडला. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात यूएई संघाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी यूएई संघाकडून फलंदाजी करताना 20व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अयान अफजल खान (Aayan Afzal Khan) फ्रेड क्लासेनच्या गोलंदाजीवर टॉम कूपर याच्याकडून झेलबाद झाला. यावेळी तो 5 धावा करून तंबूत परतला. यावेळी पव्हेलियनमध्ये परत जात असताना त्याच्यासोबत विचित्र घटना घडली. तो सीमारेषेवर पाय अडखळून पडला. यादरम्यानचा व्हिडिओ नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

नेमकं काय घडलं?
झाले असे की, अयान बाद होऊन पव्हेलियनमध्ये जात होता, तेव्हा त्याने त्याचे कपडे ठीक करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान तो सीमारेषा पाहण्यास विसरला. त्याचा पाय सीमारेषेला धडकला आणि तो समोर तोंडघशी पडला. त्याचा व्हिडिओ इंग्लंडच्या बार्मी आर्मीने शेअर केला आहे. विशेष म्हणजे, बार्मी आर्मीचे ट्वीट इंग्लंडचा माजी कर्णधार ऑयन मॉर्गन याने रिट्विट केले आहे.

सामन्याचा आढावा
या सामन्यात यूएई संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना 112 धावांचे आव्हान उभे केले होते. हे आव्हान नेदरलँड्सने 7 विकेट्स गमावत 1 चेंडू शिल्लक ठेवत पूर्ण केले. यावेळी नेदरलँड्सकडून मॅक्स ओडोड याने सर्वाधिक 23 धावा चोपल्या. त्याच्याव्यतिरिक्त कॉलिन ऍकरमन याने 17 धावा, स्कॉट एडवर्ड्स (नाबाद 16) , टीम प्रिंगल (15) आणि बॅस डी लीड्स याने 14 धावा चोपल्या. इतर एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या करता आली नाही. मात्र, तरीही संघाने शानदार विजय मिळवला.

यावेळी यूएईकडून गोलंदाजी करताना जुनैद सिद्दीकी याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 24 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त बेसिल अहमद, अयान अफजल खान आणि कार्तिक मेयप्पन यांनी प्रत्येकी एका विकेटवर आपले नाव कोरले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: धवनला न विचारताच वडिलांनी ठरवलं लग्न! वरून लेकालाच मारला जबरदस्त डायलॉग
चाहत्याने ओलांडली हद्द! फोटो घ्यायला आलेल्या पाकिस्तानी खेळाडूसोबत घडलेला प्रकार पाहाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---