---Advertisement---

UAE vs NZ: टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडला हा पराक्रम, जाणून घ्या काय झाले

New Zealand vs UAE
---Advertisement---

संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि न्यूझीलंड या दोन संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेला 17 ऑगस्टपासून सुरुवात झाली. पहिला सामना अतिशय रोमांचक झाला. ज्यात किवी संघाने अखेर 19 धावांनी सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात असे काही पाहायला मिळाले जे आजपर्यंत टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पाहिले गेले नाही.

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही संघांनी त्यांच्या फलंदाजीच्या पहिल्या चेंडूवर विकेट गमावल्या आहेत. न्यूझीलंड संघाला सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला. त्यांना पहिला धक्का जुनैद सिद्दीकीने चाड बोसची विकेट मिळवून दिला. त्याचवेळी, यूएई संघाला डावाच्या पहिल्या चेंडूवर कर्णधार मोहम्मद वसीमच्या रूपाने धक्का बसला, ज्याला न्यूझीलंड संघाचा कर्णधार टीम साऊदीने आपला बळी बनवले.

https://twitter.com/FanCode/status/1692206444802937052?s=20

https://twitter.com/FanCode/status/1692181383626862727?s=20

या सामन्यात 18 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज आर्यांश शर्मा (Aryansh Sharma) चे यूएई कडून टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झाले. त्याने पहिल्याच सामन्यात 43 चेंडूत 60 धावांची शानदार खेळी केली. आर्यांश आता पदार्पणाच्या सामन्यात यष्टिरक्षक म्हणून टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

न्यूझीलंड संघाचा कर्णधार टीम साऊदीने चेंडूसह अप्रतिम खेळ दाखवला
मालिकेतील पहिल्या टी20 सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर आला. टीम सेफर्टच्या 55 धावांच्या जोरावर 20 षटकात 6 गडी गमावून न्यूझीलंडने 155 धावा केल्या. प्रत्युत्तरात यूएईचा संघ 19.4 षटकांत 136 धावांवर गारद झाला. न्यूझीलंड संघाचा कर्णधार टीम साऊदी (Tim Southee) याने बॉलसह अप्रतिम 5 विकेट्स घेतल्या. याशिवाय मिचेल सँटनर आणि जिमी नीशम यांनीही 2-2 विकेट घेतल्या. आता दोन्ही संघांमधील मालिकेतील दुसरा टी20 सामना 19 ऑगस्ट रोजी होणार आहे. (uae vs new zealand first time in t20 international cricket history both team lose fisrt wicket in first ball)

महत्वाच्या बातम्या- 
आयर्लंडच्या खेळाडूचे बुमराह आणि कंपनीला ओपन चॅलेंज! म्हणाला, “आम्ही तुम्हाला…”  
पृथ्वी शॉचे कमबॅक फसले! दुखापतीमुळे बराच काळ राहणार बाहेर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---